मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांत अनेक मराठी सध्या टीव्हीवर अनेक मालिका लोकप्रिय होत असून त्यात वेगवेगळ्या कलाकारांची एन्ट्री होताना दिसत आहे. काही मालिकांमध्ये नवे नवे कलाकार पाहायला मिळाले. आता आणखी एका मालिकेत नवी एन्ट्री होतेय. सोनी मराठीवरील ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ऑफिसमध्ये बॉस आणि घरी बायको हे नातं अनेकदा समाजातही दिसतं. अशाच नात्यातील प्रेमकहाणी असलेल्या ‘बॉस माझी लाडाची’ ही मालिका प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेत बॉस राजेश्वरी आणि नवरा मिहीर यांचं लग्न जरी वेगळ्या हेतूने झालं असलं तरी आता या दोघांमध्ये प्रेमाचा धागा गुंफला जावा असं प्रेक्षकांना वाटत आहे.
या मालिकेत बॉसची हिट्लरशाही, बॉस आणि मिहीर यांच्यातील छोटे मोठे वाद, मधेच त्यांचं प्रेम हे सगळं बघायला प्रेक्षकांना मजा येत होती. पण आता बॉसच्या वरिष्ठाशी बॉस कशी वागेल, तेजस बर्वे नेमक्या कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, त्याच्या एन्ट्रीमुळं बॉस आणि मिहीर एकमेकांच्या जवळ येतील कि अजून दूर जातील हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
बॉसच्या ऑफिसमध्ये कोण आलंय?
पाहा, 'बॉस माझी लाडाची '
आज रात्री 8:30 वा.
सोनी मराठी वाहिनीवर. #बॉसमाझीलाडाची । #BossMaziLadachi#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/KJmMs5fpzX— Sony मराठी (@sonymarathitv) July 29, 2022
या मालिकेत बॉस आणि मिहीरचं धुमधडाक्यात लग्न झालं होतं. आता कुठे बॉस आणि मिहीरमध्ये रोमँटिक क्षण फुलू लागले होते. हा ट्रॅक प्रेक्षकांना आवडतोय. त्यामुळे आता या दोघांमध्ये कोणी तिसरा येऊ नये, अशी प्रार्थना सध्या प्रेक्षक करत आहेत. बॉस माझी लाडाची’ या मालिकेत बॉस आणि महिरचं लग्न झालेलं दाखवलं त्यानंतर. आत्ताकुठे बॉस आणि मिहिर यांच्यात रोमान्स फुलू लागला होता. विशेष म्हणजे प्रेक्षकांना हा ट्रॅक आवडला होता.
मात्र आता मालिकेत या नव्या व्यक्तीची चाहूल लागल्याने या मालिकेत लव्ह ट्रँगल येण्याची शक्यता वाटते. आता या मालिकेत आलोक या पात्राची एंट्री झाली आहे. मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेता तेजस बर्वे आलोक ही भूमिका करत आहे. आलोकच्या एन्ट्रीने मालिकेत नवं वादळ येण्याची चिन्हं आहेत. झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत तेजस बर्वेला तुम्ही पाहिलं असेलच. या मालिकेत त्याने सुमीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.
मिहीरला काय मार्गी लावायचं असेल?
पाहा, 'बॉस माझी लाडाची '
आज रात्री 8:30 वा.
सोनी मराठी वाहिनीवर. #बॉसमाझीलाडाची । #BossMaziLadachi#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/hGP33HDrrn— Sony मराठी (@sonymarathitv) July 30, 2022
‘मिसेस मुख्यमंत्री’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा तेजस घराघरात पोहचला होता. आता तो ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेत धमाकेदार एन्ट्री घेतो आहे. ‘बॉस माझी लाडाची’चा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. त्यामध्ये तेजस बर्वेची बॉसच्या ऑफिसमध्ये एंट्री झालेली दाखवली आहे. या मालिकेत तेजस कोणती भूमिका साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
पण प्रोमो पाहता तो बॉसला टक्कर द्यायला आला आहे असं सध्या दिसतंय. प्रोमोमध्ये तेजस हा बॉसच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसोबत बसलेला आहे. बॉस कसा असावा हे तो त्यांना समजावून सांगत आहे. मालिकेत आतापर्यंत एकच बॉस होती पण आता कदाचित बॉसच्या बॉसची मालिकेत एंट्री होणार असं दिसतंय. त्यामुळे येत्या काळात मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार, त्यामुळे आता हो मालिका आणखी रंजक बनणार असे दिसते.
बॉसविषयी आऊचे कान कोणी भरले असतील?
पाहा, 'बॉस माझी लाडाची '
आज रात्री 8:30 वा.
सोनी मराठी वाहिनीवर. #बॉसमाझीलाडाची । #BossMaziLadachi#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/06HPfAaJp9— Sony मराठी (@sonymarathitv) July 28, 2022
Entertainment Marathi TV Serial Boss Mazi Ladachi