इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलिब्रिटी छोटा असो की मोठा, चर्चा तर होतेच. सध्या अशीच एका गायकाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी यातील आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटील मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत आजही सगळ्यांच्या आठवणीत आहेत. हे पाचहीजण संगीत क्षेत्रात उत्तम काम करतात. यातीलच एक गायक सध्या शेतीमध्ये रमला आहे. गायक प्रथमेश लघाटे आपल्या कामामधून ब्रेक घेत सध्या कोकणातील गावी पोहोचला आहे. तेथील काही फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. प्रथमेशचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले असल्याचे चित्र आहे.
प्रथमेशच्या गोड गळ्याचे कायमच कौतुक झाले आहे. सध्या प्रथमेश आपल्या गावी कोकणात चाफेडला पोहचला आहे. घरच्या शेतामध्ये तो भात कापणी करतो आहे. प्रथमेशने गावाकडचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, “माझ्या आजोळी, चाफेड गावात मामाबरोबर भातकापणीचा अनुभव मी घेतला. त्याचाच नवाकोरा व्लॉग उद्या तुमच्यासाठी घेऊन येतो आहे.”
कोकणात मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते. दिवाळीत भात कापणी केली जाते. मात्र पाऊस उशिरापर्यंत मुक्कामी असल्याने या कापणीला उशिरा सुरवात झाली आहे. प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून छान कमेंट आल्या आहेत. ”भात कापायला आमच्याकडेही ये”, ‘खूप भारी’, ‘शेतकरी दादा’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी त्याचे हे फोटो पाहून केले आहेत. प्रथमेशच्या आवाजाचे हजारो चाहते आहेत. मराठी चित्रपटांसाठीही त्याने काम केलं आहे. सध्या तो आपल्या कामामधून वेळ काढत शेतीच्या कामांचा आनंद घेतो आहे.
Entertainment Marathi Singer Farming Wheat
Prathamesh Laghate