इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्व हे एक मायाजाल आहे असे म्हटले जाते. इथे रोज नवनवीन चेहरे येत असतात. प्रेक्षकांना ते आवडले तर ते लोकप्रिय होतात. मात्र, या नाव मिळवण्यासोबतच येथे टिकून राहणे देखील गरजेचे आहे. येथे नाव कमावणं जेवढं कठीण आहे त्यासोबत ते टिकवणं देखील कठीण आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडून तुमचं संपूर्ण करिअर उद्धवस्त होऊ शकतं. असच काही बॉलिवूडमधील कलाकारांसोबत घडलं आहे. कधी काळी लोकप्रिय असलेले हे कलाकार अचानक या मनोरंजन विश्वातून गायब झाले.
अभिजीत भट्टाचार्य हा बॉलिवूडचा एकेकाळचा लोकप्रिय पार्श्वगायक होता. पण आज त्याच्याकडे काम नाही. बॉलिवूडमधील खान मंडळींविरोधात बोलणं त्याला महाग पडलं. यानंतर इंडस्ट्रीत त्याला काम मिळणं जवळपास बंद झालं. कोईना मित्रा एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री होती. पण अधिक सुंदर दिसण्याच्या नादात तिने प्लास्टिक सर्जरी केली आणि इथेच तिची मोठी चूक झाली. या सर्जरीने तिचा चेहरा बिघडला आणि तिला काम मिळणं बंद झालं.
अमन वर्मा एकेकाळी टीव्हीचा लोकप्रिय चेहरा होता. अनेक सिनेमातही त्याने काम केलं. पण २००५ मध्ये एका न्यूज चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याला एका तरूणीकडे शरीरसुखाची मागणी करताना दाखवलं गेलं आणि त्याच्या करिअरला ब्रेक लागला.
ममता कुलकर्णी ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. चाहते तिच्यावर फिदा होते. पण करिअर पिकवर असताना तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं आणि तिला सिनेमे मिळणं जणू बंद झालं. अनेक वर्षानंतर ममता कुलकर्णीचा एक फोटो समोर आला होता. यात ती साध्वीच्या रूपात दिसली होती.
शायनी आहुजाने हजारों ख्वाहिशें ऐसी, गँगस्टर, भुल भुलैय्या अशा अनेक चित्रपटात काम केलं. पण २००९ मध्ये त्याच्यावर मोलकणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. त्याला अटकही झाली. तेव्हापासून त्याचंही करिअर जवळपास संपलं. परत तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.
फिरोज खानचा मुलगा फरदीन खान हा चॉकलेट हिरो. करिअर जोमात असताना २००१ साली त्याच्यावर ड्रग्ज खरेदी करण्याचा आरोप झाला आणि त्याच्या करिअरला ओहटी लागली. लवकरच फरदीन खान ‘नो एन्ट्री’मधून वापसी करणार असल्याची चर्चा आहे.
शक्ती कपूर यांचं करिअर चांगलं सुरू होतं. पण २००५ मध्ये शक्ती कपूर एका स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकले. एका तरूणीला चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात ते सेक्शुअल फेवर मागताना दिसले. या स्कँडलनंतर शक्ती कपूरच्या करिअरलाही ब्रेक लागला. ते क्वचित एखाद्या सिनेमात दिसतात.
मनीषा कोईराला हिने अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर एका वळणावर ती दारूच्या आहारी गेली होती. असं म्हणतात की, तिच्या या व्यसनामुळे तिला काम मिळणं बंद झालं. यानंतर कॅन्सर झाल्यानं तिने ब्रेक घेतला. आता तिने कमबॅक केलं आहे.
विवेक ओबेरॉयने २००२ साली रामगोपाल वर्माच्या कंपनी या चित्रपटातून डेब्यू केला होता. पुढच्याच वर्षी ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटाच्या सेटवर विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. मग काय, ऐश्वर्याचा एक्स-बॉयफ्रेन्ड सलमान खान त्याच्या मार्गात आला. विवेकने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानवर अनेक गंभीर आरोप केले. पण याचा सलमानच्या करिअरवर काहीही परिणाम झाला नाही. याउलट विवेकच्या करिअरला फुलस्टॉप लागला.
Entertainment Bollywood Celebrity Career Destroy
Vivek Oberoi Shakti Kapoor Manisha Koirala Mamta Kulkarni Fardin Khan