शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कुटुंबातूनच मिळवला वारसा… बालवयातच रंगभूमी…. अनेक भाषांमधील चित्रपटात अभिनय… अशी आहे विक्रम गोखले यांची लख्ख कारकीर्द

नोव्हेंबर 26, 2022 | 6:35 pm
in मनोरंजन
0
Fie3NuJUoAAxnQ9

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रंगभूमी, चित्रपट, मालिका या प्रत्येक माध्यमात अगदी लीलया वावरणारे चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनयसम्राट विक्रम गोखले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. १५ दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार होते. उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं आज निधन झालं. विक्रम गोखले यांचं नाव घेतलं तरी त्यांच्या चाहत्यांना ‘बॅरिस्टर’ या नाटकामधील त्यांचा दमदार परफॉर्मन्स आठवतो. विक्रम गोखले यांना अभिनयाचा आणि संगीताचा जन्मजात वारसा लाभला. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या नायिका असा लौकिक असलेल्या कमलाबाई गोखले या त्यांच्या आजी आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटविणारे चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील. कलाप्रेमी कुटुंबात विक्रम गोखले यांना कलेचे बाळकडू मिळणे साहजिक आहे.

बालकलाकार म्हणून सुरुवात
विक्रम चंद्रकांत गोखले यांचा जन्म पुण्याचा. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल आणि वि.र. वेलणकर हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस. (आताचे आबासाहेब गरवारे) महाविद्यालयात झाले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. बालवयातच त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्यांनी ‘आग्य्राहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या. तर याच काळात त्यांनी ‘शेवग्याच्या शेंगा’ या चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला.

परस्परांहून वेगळ्या भूमिका
‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होय. मराठी चित्रपटात नायक म्हणून ‘अनोळखी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार, उत्तम संवादफेक, देखणे-रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि अभिनयातील सहजता या त्रिवेणी संगमातून मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटात आशा काळे, नयनतारा, सतीश दुभाषी या कलाकारांसोबत विक्रम गोखले यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. १९८९मधील ‘कळत नकळत’ आणि १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ या दोन्ही मराठी चित्रपटांत परस्परांहून वेगळ्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. याशिवाय ‘कुंकू’, ‘मुक्ता’, ‘लपंडाव’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘वर्‍हाडी आणि वाजंत्री’, ‘बिजली’, ‘आधारस्तंभ’ आदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या.

प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन
विजया मेहता यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकातील त्यांची मध्यवर्ती भूमिका खूप गाजली. कोणत्याही भूमिकेशी समरस होऊन ताकदीने ती भूमिका जिवंत करण्याचे त्यांचे कसब होते. कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पणाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘ढाई अक्षर प्यार के’, ‘जरा मुस्करा दो’ या हिंदी नाटकांशिवाय ‘दूरदर्शन’ मालिकांमध्येही त्यांचा सहभाग होता. ‘विरुद्ध’ या मालिकेतील ‘धीरेंद्रराय सिंघानिया’ या त्यांनी साकारलेल्या भूमिकेची खूप चर्चा झाली. ‘जीवनसाथी’, ‘संजीवनी’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या हिंदी मालिका आणि ‘या सुखांनो या’, ‘अग्निहोत्र’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला. मराठी व हिंदीसह त्यांनी गुजराती, तामिळ तसेच कन्नड या अन्यभाषिक चित्रपटांतूनही काम केले. आपल्या परीने ते लेखनही करत होते. नाट्य-चित्रपट संदर्भातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे येथे अतिथी प्राध्यापक म्हणून ते मार्गदर्शन करत.

म्हणून नाटकाचे प्रयोग थांबवले
अभिनय क्षेत्रात भारदस्त कामगिरी करतानाही सामाजिक भान आणि खरेपणा जपणार्‍या या मनस्वी कलाकाराने ‘पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चीही स्थापना केलेली आहे. चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांमध्ये व्यग्र असले, तरी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांना सभोवतालचे भान होते. विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार होते. काही वर्षांपूर्वी विक्रम गोखले हे ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. परंतु, शारीरिक कारणांमुळे विक्रम गोखले यांनी या नाटकाचे प्रयोग करणं थांबविलं. अशा दिग्गज अभिनेत्याच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीचं अतोनात नुकसान झालं आहे. विक्रम गोखलेंना भावपूर्ण आदरांजली.

कारकीर्द
हिंदी चित्रपटांतही विक्रम गोखले यांनी आपल्या हिंदी शब्दोच्चारांनी आणि सहजसुंदर, परिपक्व अभिनयाने आपला ठसा उमटविला आहे. ‘इन्साफ’, ‘खुदा गवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हे राम’, ‘भुलभुलैया’, ‘मदहोशी’, ‘तुम बिन’, ‘चॅम्पियन’, ‘लाडला’, ‘हसते हसते’, ‘शाम घनश्याम’, ‘अग्निपथ’, ‘ईश्वर’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘मिशन ११ जुलै’, ‘सो झूठ एक’, ‘गफला’, ‘धुवाँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. विक्रम गोखले यांनी ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘स्वामी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘बॅरिस्टर’, ‘दुसरा सामना’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘संकेत मिलनाचा’, ‘खरं सांगायचं तर’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘नकळत सारे घडले’ इ. नाटकांत मुख्य भूमिका केल्या होत्या.

पुरस्कार
‘वजीर’ (१९९४) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात मिळाले. डॉक्टरी पेशावर आधारित कथेवर ‘आघात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. ‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना २०१३मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ व ‘न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्येही त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २०१३ मध्ये ‘अनुमती’ या चित्रपटासाठी विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच २०१२ मध्ये रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Entertainment Actor Vikram Gokhale Life journey

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

MPSCच्या २ डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध; डाऊनलोड करण्यासाठी फक्त हे करा

Next Post

पंतप्रधान मोदींनी लॉन्च केला ई कोर्ट प्रोजेक्ट; काय आहे तो? याचिकाकर्त्यांना मिळणार हे सर्व लाभ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
court

पंतप्रधान मोदींनी लॉन्च केला ई कोर्ट प्रोजेक्ट; काय आहे तो? याचिकाकर्त्यांना मिळणार हे सर्व लाभ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011