रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या वर्षापासून इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम बदलणार

by India Darpan
ऑगस्ट 13, 2023 | 12:22 am
in संमिश्र वार्ता
0
images 29


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नाविन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी सलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करुन शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ पासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील म्हणाले, भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. राज्यात तंत्रशिक्षण विभाग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सध्याच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करुन शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ पासून प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम लागू करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम डिसेंबर २०२५ पर्यंत टप्या-टप्प्या पूर्णपणे विकसित करण्यात येईल.

तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तंत्र शिक्षण अभ्यासक्रमात करण्यात येत असून एकूण ४९ एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमाकरिता प्रथम सत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच या अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने “K” Scheme या नावाने संबोधले जाणार आहे. हा अभ्यासक्रम परिणाम आधारित (Outcome Based) क्रेडिट सिस्टमवर आधारित असणार आहे. यामध्ये प्रत्येक सत्र हे २०-२२ क्रेडिटचे असून एकूण सहा सत्रांचा पदविका अभ्यासक्रम हा १२०-१३२ क्रेडिटचा असणार आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षणामध्ये पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ६ आठवड्यांचा कालावधी वाढवून आता १२ आठवड्यांचा करण्यात येत आहे, डिजिटल मीडिया MOOCs चा प्रभावी उपयोग करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात अंतर्भाव असणार आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाकरिता योग आणि ध्यानसाधना” या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे, भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge System) विविध विषयांमध्ये अंतर्भुत करण्यात आली आहे,या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधान (Indian Constitution) या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्याकरीता स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन (Self Learning Assessment) होणार आहे, तसेच

मल्टीपल एन्ट्री – मल्टीपल एक्झिट ची तरतूद करण्यात येत असून प्रथम वर्षाअंती एक्झिट करणाऱ्‍या विद्यार्थ्यांना Certificate of Vocation, व्दितीय वर्षांअंती एक्झिट करणाऱ्‍या विद्यार्थ्यांना Diploma in Vocation व तृतीय वर्षांअंती Diploma in Engineering ची तरतूद करण्यात आलेली आहे. व्दितीय व तृतीय वर्षांच्या प्रवेशाकरिता मल्टीपल एन्ट्रीची तरतूद करण्यात येणार आहे.याच बरोबर उन्नत महाराष्ट्र अभियानातील उद्देशानुसार प्रादेशिक गरजांचा अभ्यास करून तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या दृष्टीने अभ्याक्रमात विशेष समावेश करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापर्ण शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी सुद्धा अधिक उपलब्ध होतील, असे तंत्र शिक्षण संचालक डॉ. मोहितकर यांनी माहिती देताना सांगितले.

Engineering syllabus will change from this year
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या लेखकाची ‘जोकर बनला किंगमेकर’ बालकादंबरी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

Next Post

१५ ऑगस्टपासून अंमलबजावणी; सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’

India Darpan

Next Post
doctor

१५ ऑगस्टपासून अंमलबजावणी; सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011