मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने समन्स बजावले आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी उद्या (२८ जून) हजर राहण्याचे या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. संजय राऊत यांना पाठवण्यात आलेल्या समन्सवर शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, एजन्सीने भाजपच्या भक्तीचे उदाहरण ठेवले आहे. त्यानुसार त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसनेही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी ईडीनं संजय राऊत यांना नोटीस दिली आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
राऊत यांना नोटीस दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात ईडीचाही प्रवेश होऊ शकतो, असे मानले जात आहे. यापूर्वीही शिवसेनेचा आरोप आहे की केंद्र सरकार एजन्सींचा गैरवापर करत आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटातील आमदारांबाबत संजय राऊत हे जोरदार हल्लाबोल करत आहेत. एवढेच नाही तर शिवसेनेतील बंडखोरांना मुंबईत येण्याचे आव्हानही त्यांंनी दिले आहे.
शिवसैनिकांच्या संयमाची परीक्षा होत असून रस्त्यावर उतरल्यास काहीही होऊ शकते. या संपूर्ण वादावर शिवसेनाही रस्त्यावर उतरणार असून कायदेशीर लढाईही लढणार आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिंदे गटाने संजय राऊत यांच्यावरही हल्ला चढवला आहे की, राऊत हे राज्यसभेवर आहेत ते निवडून आलेल्या नेत्यांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत.
enforcement directorate summons to sena mp sanjay raut Maharashtra Political Crisis