नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या तीन महिन्यांत सुमारे १०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. मोबाईल गेमिंग ऍप्लिकेशनशी संबंधित फसवणूक प्रकरणात कोलकाता येथील एका व्यावसायिकाच्या घरातून आतापर्यंत १७ कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी एक मशीन बसवली आणि ८ बँक अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. या रोख रकमेचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी, पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी निलंबित मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या अपार्टमेंटमधून ५० कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते, असे इंडिया टुडेच्या अहवालात म्हटले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. पार्थ चॅटर्जी गट ‘क’ आणि ‘ड’ कर्मचारी, इयत्ता नववी-बारावीचे सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या कथित भरती घोटाळ्यात सामील आहे. ही रक्कम शिक्षक भरती घोटाळ्यातून जमा झाल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे.
सुमारे २४ तास रोख मोजणी सुरू होती. जप्त करण्यात आलेल्या नोटांचा अक्षरशः डोंगरासारखा ढीग होता. या नोटा मोजण्यात बँक अधिकारी थकले होते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापूर्वी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी झारखंड खाण घोटाळ्यात २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. या जप्तीशिवाय, एजन्सीने इतर अनेक छाप्यांमध्येही अल्प रक्कम जप्त केली आहे.
जप्त केलेल्या पैशांचे काय होते?
ईडीने जप्त केलेल्या रोख रकमेचे काय केले जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचा एक प्रोटोकॉल देखील आहे. जेव्हाही कुठूनही रोख रक्कम वसूल केली जाते तेव्हा ती प्रथम मोजली जाते. सहसा ही मोजणी बँकेचे कर्मचारी करतात. मोजणीदरम्यान कोणत्या नोटा आणि त्यांची संख्या देखील नोंदवली जाते. त्यानंतर ते बॉक्समध्ये भरून सीलबंद करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा केले जाते. ता या जमा झालेल्या पैशांचे काय होते ही सुद्धा एक वेगळी प्रक्रिया आहे.
Enforcement Directorate Seized 100 Crore Cash in Last 3 Months
ED Raid