नागपूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने देशमुख यांच्या नागपुरातील संस्थांवर छापे टाकले आहेत. आज दुपारच्या सुमारास ईडीच्या पथकाने देशमुख यांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या कॉलेजवर छापा टाकला आहे. काटोल मार्गावर हे कॉलेज आहे. या संस्थेतील विविध व्यवहार आणि कागदपत्रांची तपासणी पथकाकडून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. देशमुख अध्यक्ष असलेल्या साई शिक्षण संस्थेवरही ईडीने छापा टाकला आहे. देशमुख यांना यापूर्वी चारवेळा ईडीने नोटिस बजावली आहे. त्यांना चौकशीस हजर राहण्याचे त्यात म्हटले होते. मात्र, देशमुख हे हजर झालेले नाहीत. त्यानंतर आता ईडीने छापे टाकून देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहेत. परिणामी, येत्या काही दिवसात देशमुख यांना अटक होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1423574825809768453