मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या नेतृत्वाखाली, सर्व बँकिंग नियमांचे “उल्लंघन” केल्याचा ठपका सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने ठेवला आहे. या लोकांनी जाणूनबुजून शेल कंपन्यांना कर्ज मंजूर केले आणि सरकारी पैशांची उधळपट्टी केली, असे ईडीने स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 27 जानेवारी रोजी ईडीच्या छाप्यात ‘अडथळा’ आणणे आणि ‘पुरावे नष्ट करणे’ या आरोपाखाली मूलचंदानी आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना अटक केल्यानंतर या संदर्भात ईडीने अधिकृत माहिती दिली आहे. झडतीदरम्यान ईडीने 2.72 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने, सुमारे 41 लाख रुपये रोख, चार हाय-एंड कार, डिजिटल उपकरणे आणि दोषी कागदपत्रे जप्त केली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की सहकारी बँकेच्या कामकाजाच्या तपासात 429.6 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मूलचंदानी यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ या गैरव्यवहारात गुंतलेले आहे.
https://twitter.com/dir_ed/status/1620035834153152514?s=20&t=GoW7S5TvbF9D9_xwK0rocA
Enforcement Directorate on Amar Moolchandani Fraud