जयपूर – सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या धाडी केवळ महाराष्ट्रातील नेते आणि व्यक्तींवरच सुरू असल्याचा काहींचा गैरसमज असेल तर दूर होणे गरजेचे आहे. ईडी ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. त्यामुळे ती देशभरात विविध ठिकाणी सक्रीय आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे बंधू अग्रसेन यांना सक्तवसुली संचालनालयाकडून वारंवार नोटिसा पाठविल्या जात आहेत. खतांच्या निर्यातीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अग्रसेन हे आज ईडीच्या कार्यालयाच चौकशीसाठी हजर झाले होते. याप्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नसला तरी मला वारंवार का बोलवले जात आहे, हे मला समजत नाही, अशी प्रतिक्रीया अग्रसेन यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचे काँग्रेससह अन्य नेत्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1447450236918456320