मुंबई – माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे. भोसला जमीन घोटळयाप्रकरणी ही अटक केली आहे. काल दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहे.
खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई अटळ असल्याचे बोलले जात होते. पण, आज ईडीने त्यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. या घोटाळ्या प्रकरणी खडसे यांनाही ईडीने अगोदर समन्स दिला होता. पण, त्यांनी तब्येतीचे कारण सांगत चौकशीला जाणे टाळले होते. आता ईडी खडसेंवर काय कारवाई करते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
२०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर याप्रकरणी विविध चौकशाही झाल्या. पण, त्यानंतर ईडीकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणात कारवाई केली. भोसरी येथील भूखंड हे ३१ कोटी रुपयांचे असतांना ३ कोटी ७ लाख रुपयाला घेण्यात आला, रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी केल्याचाही या प्रकरणात आरोप आहे.