इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने शनिवारी बेंगळुरूमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले. ईडीची ही कारवाई एडटेक कंपनी बायजूचे सह-संस्थापक रवींद्रन बायजू यांच्याशी संबंधित फॉरेन एक्स्चेंज ट्रान्झॅक्शन (फेमा) प्रकरणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. छापेमारीत या ठिकाणांहून अनेक कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे.
ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) तरतुदींनुसार दोन व्यवसाय आणि एक निवासी अशा एकूण तीन जागेवर नुकतेच छापे टाकण्यात आले. तपास एजन्सीने माहिती दिली की त्यांनी विविध दोषी कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केला आहे.
काही लोकांकडून आलेल्या विविध तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. रवींद्रन बायजू यांना “अनेक” समन्स पाठवण्यात आले होते, परंतु तो “टळत राहिला आणि ईडीसमोर कधीही हजर झाला नाही” असा आरोप तपास संस्थेने केला आहे.
शोधादरम्यान असे आढळून आले की रवींद्रन बायजू यांच्या ‘थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला 2011 ते 2023 या कालावधीत थेट विदेशी गुंतवणूक (FDI) अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपये मिळाले. “कंपनीने या कालावधीत थेट विदेशी गुंतवणुकीच्या नावावर विविध परदेशी प्राधिकरणांना सुमारे 9,754 कोटी रुपये पाठवले,” असे एजन्सीने म्हटले आहे.
Enforcement Directorate ED Raid on Byju’s Offices