नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या बरोबरचं ईडीनं काही कागदपत्रं आणि अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत. बीबीसी मध्ये असलेल्या थेट परकीय गुंतवणूक नियमांचंही उल्लंघन झाल्यानं इडीनं हा गुन्हा नोंदवला आहे. या आधी फेब्रुवारी महिन्यात आयकर विभागानं करचुकवेगीरीच्या संशयावरून बीबीसीच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.
https://twitter.com/ANI/status/1646393561582276608?s=20
भूषण पॉवर कंपनीची २५ कोटींची मालमत्ता जप्त
बँक घोटाळ्याप्रकरणी ओडिशातल्या भूषण पॉवर कंपनीची २५ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. या मालमत्तेत इमारती, कारखाने, यंत्र, जमिनी आदींचा समावेश आहे. सीबीआय नं कंपनीच्या माजी पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारावर मनी-लाँडरिंग प्रतिबंध कायद्याखाली ही कारवाई केली असल्याचं, सक्तवसुली संचालनालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. कंपनीनं गैरमार्गानं अनेक बँकांमधून कर्ज काढल्याचं तपासाअंती समोर आलं होतं.
Enforcement Directorate ED BBC FIR