इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोबाईल ऍप्लिकेशन फसवणूक प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकाता येथील एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला आहे. सहा ठिकाणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातून बरीच रोकड सापडल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत सात कोटी रुपये मोजले गेले आहेत. अजूनही मोजणी सुरू आहे. या नोटा मोजणीसाठी नोटा मोजण्याचे अनेक यंत्र मागविण्यात आले आहेत.
ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने बँक अधिकाऱ्यांसह कोलकाता येथील गार्डन रीच भागातील व्यापारी नासिर खान यांच्या परिसरात छापा टाकला. या छाप्यात ७ कोटी रुपये रोख आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, छापे टाकले जात आहेत आणि नेमकी किती रोकड जप्त करण्यात आली आहे हे तपासण्यासाठी रोख मोजणी यंत्रे आणण्यात आली आहेत.
https://twitter.com/dir_ed/status/1568530998845145088?s=20&t=PZokui1s5kONkZM8jXEAlg
व्यावसायिकाच्या निवासस्थानावर ईडीच्या छाप्यांदरम्यान या भागात केंद्रीय फौजा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या आहेत. मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा ईडीला संशय असलेल्या व्यावसायिकांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा हा शोध आहे. फेडरल बँकेच्या अधिकार्यांनी आमिर खान नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्याने मोबाईल गेमिंग अॅप्सद्वारे लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल करण्यात आला.
ईडीच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, “मोबाईल गेमिंग अॅपमध्ये सुरुवातीच्या काळात लोकांना बक्षीस म्हणून कमिशनचे आमिष दाखवले जात होते. यामुळे लोक या अॅपकडे आकर्षित झाले. त्यानंतर लोकांनी अधिक कमिशन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर अॅप ऑपरेटर्सनी हे अॅप सुरू केले. मात्र, हा सर्व फसवणुकीचा खेळ ठरला.”
कथित फसवणूक करणार्यांच्या मोडस ऑपरेंडीचा तपशील देताना ईडीने सांगितले की, “लोकांकडून मोठी रक्कम गोळा केल्यानंतर, या अॅपमध्ये अपग्रेडेशनच्या नावाखाली अचानक पैसे काढणे बंद करण्यात आले. त्यानंतर प्रोफाइल माहितीसह भरपूर डेटा व अॅप सर्व्हरवरून काढून टाकण्यात आले. नंतर लोकांना कळले की त्यांची फसवणूक झाली आहे.”
https://twitter.com/MirrorNow/status/1568528116607221760?s=20&t=PZokui1s5kONkZM8jXEAlg
Enforcement Directorate Raid Kolkata Crore Notes Found
ED Money Laundering Trader Mobile Gaming App Fraud Cheating