सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिअल इस्टेट, बीएफएसआय क्षेत्रात मिळाल्या सर्वाधिक नोकऱ्या; या उमेदवारांच्या नियुक्तीकडे कंपन्यांचा कल

by India Darpan
मे 6, 2023 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
job

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावर्षी एप्रिल महिन्यात रिअल इस्टेट, बीएफएसआय या क्षेत्रांसह ऑइल अँड गॅस, विमा आदी क्षेत्रांमध्ये नोकर भरतीत चांगली वाढ झाल्याचे नोकरी जॉबस्पीक इंडेक्समधून निदर्शनास आले आहे. रिअल इस्टेट व बीएफएसआय यांसारख्या नॉन-टेक क्षेत्रांमधील सक्रिय भरतीने आयटी क्षेत्रातील नोकरभरतीमधील घट कमी केली. भौगोलिकदृष्ट्या अहमदाबाद व वडोदरा या शहरांनी एप्रिल २०२३ मध्ये अनुक्रमे वार्षिक २८ टक्क्यांची व १४ टक्क्यांची प्रबळ वाढ दर्शविली. मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये व्हाईट कॉलर नोकऱ्यांच्या मागणीत मात्र ५ टक्क्यांनी घट पहायला मिळाली आहे.

नोकरी जॉबस्पीक इंडेक्स या भारतातील प्रमुख जॉब इंडेक्सने एप्रिल २०२३ मध्ये व्हाइट-कॉलर हायरिंगच्या वैविध्यपूर्ण स्थितीचे अनावरण केले आहे. रिअल इस्टेट क्षेत्राने नोकर भरतीत २१ टक्के वाढ दर्शवली आहे. याव्यतिरिक्त नोकरभरतीच्या कामात अधिक वाढ असलेल्या क्षेत्रांमध्ये ऑईल अॅण्ड गॅस (तेल व वायू) क्षेत्राने २० टक्क्यांची, विमा क्षेत्राने १३ टक्क्यांची आणि बँकिंग क्षेत्राने ११ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तर ऑटो क्षेत्र व फार्मा क्षेत्रातील नोकरभरती अनुक्रमे ४ टक्क्यांनी व ३ टक्क्यांनी वाढली.

‘‘एप्रिलमध्ये नियुक्‍ती प्रक्रियेत वाढीमध्ये रिअल इस्टेट, बीएफएसआय आणि ऑईल अॅण्ड गॅस यांसारख्या काही प्रमुख क्षेत्रांचे वर्चस्व होते. आयटी-केंद्रित महानगरांनी सावधपणे नियुक्ती करण्याची भावना दाखवली असताना अहमदाबाद आणि वडोदरासारखी उदयोन्मुख शहरे चमकदार कामगिरी करत असल्याचे नोकरीडॉटकॉमचे प्रमुख व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांनी सांगितले.

रिअल इस्टेटमध्ये विकासगती कायम:
रिअल इस्टेट क्षेत्र नॉन-टेक्नॉलॉजी उद्योगांमध्ये अग्रस्थानी होते, गेल्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत नोकरभरतीमध्ये २१ टक्के वाढ नोंदवली गेली. ही वाढ प्रामुख्याने महानगरीय क्षेत्रांमध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या नवीन लाँचमध्ये वाढ झाल्यामुळे झाली, ज्यामुळे निविदा व्यवस्थापक, बांधकाम अभियंता आणि स्थापत्य अभियंता यांसारख्या महत्त्वाच्या पदांकरिता नियुक्ती करण्यास चालना मिळाली. मोठ्या महानगरांपैकी कोलकाता, पुणे आणि हैदराबादने रिअल इस्टेट क्षेत्रासाठी नियुक्तीमध्ये अनुक्रमे २८ टक्के, २२ टक्के व १९ टक्क्यांची नोकरभरती मध्ये वाढ नोंदवली गेली. १६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची या क्षेत्रात मागणी सर्वाधिक होती.

आयटी क्षेत्रातील नियुक्तीत घट:
आयटी क्षेत्रातील नियुक्तीने गेल्या वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेत नोकरभरतीत २७ टक्क्यांची घट झाली. आयटी क्षेत्रातल्या मोठ मोठ्या कंपन्या, स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न या सर्वांना सध्याच्या जागतिक मंदीचा परिणाम जाणवला आहे. बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या आयटी-केंद्रित कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असलेल्या शहरांना सर्वाधिक फटका बसला. आयटी व्यतिरिक्‍त बीपीओ, एडटेक व रिटेल अशा क्षेत्रांमध्ये अनुक्रमे १८ टक्के, २१ टक्के व २३ टक्के घसरण नोंदवली गेली.

नॉन-मेट्रो शहरांमध्ये नियुक्तीत वाढ:
नॉन-मेट्रो शहरांमध्ये अहमदाबाद नवीन रोजगार निर्मितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांच्या वाढीसह नोकरभरती ट्रेण्ड्समध्ये आघाडीवर आहे, त्यानंतर नवीन रोजगार निर्मितीमध्ये १४ टक्के व ९ टक्के वाढीसह अनुक्रमे वडोदरा व जयपूर यांचा क्रमांक आहे. बँकिंग, ऑटो आणि इन्शुरन्स क्षेत्रांनी नॉन-मेट्रो शहरांमध्ये निदर्शनास आलेल्या नोकरभरती मध्ये प्रामुख्याने योगदान दिले आहे. रिअल इस्टेट आणि ऑईल अॅण्ड गॅस ही इतर क्षेत्रे होती, जिथे नॉन-मेट्रोमध्ये सकारात्मक नोकरभरतीची भावना दिसून आली.

वरिष्ठ उमेदवारांची उच्च मागणी कायम:
१६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची मागणी गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढली, तर १३ ते १६ वर्षांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची २० टक्क्यांनी वाढली. नवीन पदवीधर आणि ४ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांच्या मागणीत गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत घट झाली आहे.

Employment Survey India Opportunity Job Vacancy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुदान मधून परतले सांगली जिल्ह्यातील २५ ते ३० नागरिक

Next Post

आज सकाळी १० वाजता सर्व जण होणार १०० सेकंद स्तब्ध; हे आहे कारण

India Darpan

Next Post
1140x570 1

आज सकाळी १० वाजता सर्व जण होणार १०० सेकंद स्तब्ध; हे आहे कारण

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011