इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही कार्यालयात असो की एखाद्या कंपनीत काम करताना आपल्या कामासाठी अधिक पैशाची अपेक्षा करणे कोणाला आवडत नाही! या उलट जास्तीत जास्त पगार मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी कधी अशा अपेक्षांचा परिणाम खूप धक्कादायक असतो. असाच काहीसा प्रकार दक्षिण अमेरिकन देश चिलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला.
चिलीच्या एका कंपनीत काम कर्मचाऱ्याला एचआर तथा कंपनी प्रशासनाच्या चुकीमुळे एका महिन्यात इतके पैसे मिळाले की, कदाचित तो आयुष्यभर कमावू शकला नसता. पण त्यानंतर जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा तो कर्मचारी चक्क गायब झाला आता कंपनी मात्र त्याचा शोध घेत बसली आहे.
एका अहवालानुसार, एका कंपनीत काम करणार्या कर्मचार्याला सामान्यतः 5,00,000 चिलीयन पेसो म्हणजे सुमारे 555 डालर्स पगार मिळत होता. पण 30 मे रोजी कंपनीच्या एचआर विभागाच्या चुकीमुळे त्याला 1,65,398,851 पेसो सुमारे 183,593 डॉलर्सचा चेक मिळाला. जेव्हा तो त्याच्या मॅनेजरकडे जादा पेमेंट झाल्याची तक्रार करण्यासाठी गेला तेव्हा त्याला कळले की, ही खरोखर एचआरची चूक आहे. त्यानंतर कंपनीने त्याला पैसे परत करण्यासाठी बँकेत जाण्यास सांगितले. त्याने दुसऱ्या दिवशी तिथे जाण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याने पैसे परत केले नाहीत.
तीन दिवसांपासून कंपनीकडून त्याला सतत फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले जात होते, मात्र त्याने कोणालाच प्रतिसाद दिला नाही. तीन दिवसांनंतर, कंपनीला त्यांच्या वकिलाकडून एक संदेश आला, ज्यामध्ये त्याने राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. तेव्हापासून ती व्यक्ती बेपत्ता आहे. त्याचा त्याच्या कोणत्याही मित्रांशी संपर्क नाही. कंपनीने पैसे वसूल करण्याच्या आशेने कर्मचाऱ्यावर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कोणत्याही देशासाठी अशा प्रकारचा मोठा परिणाम असेल, परंतु त्याचा प्रभाव चिलीमध्ये खोलवर होणार आहे. येथील कर्मचाऱ्यांना दरमहा सरासरी 1,000 डॉलर्स पगार मिळतो.
employee flee away salary 330 times more salary