इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही काम वेळेवर करणे हे प्रत्येकाला आवश्यक ठरते, विशेषतः ऑफिसच्या वेळेवर पोहोचणे हे तर प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कर्तव्य ठरते. परंतु भारतात अनेक कंपन्यांमध्ये वेळेच्या बाबतीत काटेकोर नियम पालन करत असताना काही कर्मचारी मात्र उशिरा येतात. मात्र कंपनी किंवा ऑफिस प्रशासन अशा कर्मचाऱ्यांवर उशिरा येण्याबद्दल फारशी कारवाई करत नाही, मात्र समज, देतात. परदेशात मात्र शक्यतो असे होत नाही, त्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
एका कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. तो सात वर्षात पहिल्यांदाच उशिरा आला होता. मात्र त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी त्याची बाजू घेत एक वेगळाच निर्णय घेतला. अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये एक विचित्र घटना घडली. एका ऑफिसमध्ये एक कर्मचारी सात वर्षांपासून काम करत होता. त्या कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये पोहोचायला २० मिनिटं उशिर झाला.
सामान्यपणे एखादा कर्मचारी ऑफिसात पहिल्यांदाच उशिरा पोहोचल्यास कंपनी प्रशासन त्याला समज देऊन पुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्यास सांगते. पण या कर्मचाऱ्याला मात्र त्याच्या ७ वर्षांच्या नोकरीत पहिल्यांदाच २० मिनिटं उशिरा पोहोचण्याचा चांगलाच फटका बसला. त्या कर्मचाऱ्याला कंपनीने थेट नोकरीवरूनच काढून टाकल्याची धक्कादायक घटना घडली.
कर्मचारी एकदा उशिरा आल्याने त्याला कंपनीतूनच काढून टाकण्याच्या निर्णयाचा त्याच्या सहकाऱ्यांनी चांगलाच निषेध केला. ‘नो स्टॉप इट स्टेप ब्रो’ नावाच्या युजरने ‘रेडिट’ या ‘अँटीवर्क फोरम’ वर एक मोठी पोस्ट लिहून एक कौतुकास्पद निर्णय जाहीर केला. ‘आमचा एक सहकारी गेली ७ वर्षे आमच्या बरोबर कंपनीत काम करत होता. इतक्या तो कधीच ऑफिसमध्ये उशिरा आला नव्हता. पण पहिल्यांदा ऑफिसात उशिरा आल्याने त्याला कंपनीतूनच काढून टाकल्याचे आम्हाला समजलं आहे.
२० मिनिटं उशिरा आल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आता उद्या आम्ही सर्व कर्मचारी ऑफिसला उशिराने येणार आहोत. आणि जोपर्यंत आमच्या त्या सहकाऱ्याला पुन्हा नोकरीवर रूजू करून घेतलं जात नाही, त्या दिवसापर्यंत आम्ही रोज उशिराच येणार आहोत.’ ही इंटरनेट पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टला आतापर्यंत ७८ हजार जणांनी लाईक केलं आहे. तसेच, ४ हजारांहून अधिक नागरिकांनी कमेंट करून त्या सहकाऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे. आपल्या देशात असा प्रकार घडू शकतो का? याची सध्या चर्चा सुरू आहे.
Employee Come late Company Take Action Social Viral