इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले तेव्हा जगभर चर्चा झाली. मस्क यांनी आपल्या या नव्या कामाचे मार्केटिंगही जोरदार केले. पण आता हेच ट्विटर एलन मस्क यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एलन मस्क स्वतःच ट्विटरवर ट्रोल होऊ लागले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
टेस्ला आणि इतर कंपन्यांमध्ये एलन मस्क सुखी होते. जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांनी नावलौकीक मिळवला. आणि आता ट्विटरच्या दिवाळखोरीसाठी त्यांची जगाला ओळख होत आहे. ट्विटर खरेदी केल्यापासूनच एलन मस्क यांचे ग्रह फिरले आहेत. आता तर अशी वेळ आली आहे, की ट्विटरच्या अॉफीसचं भाडंही देणं त्यांना अवघड झालं आहे. कार्यालयाचा खर्च काढण्यासाठी एकूण ६३१ वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीवर ओढवलेली ही नामुष्की सध्या जगात चर्चेत आहे.
वस्तूंच्या लिलावात व्हाईट बोर्ड, चार्जिंग मशून खूर्च्या, कॉफी मशीन, स्टेशनरी, बाईक स्टेशन, चार्जिंग मशीन, टेबल, डेस्क अश्या वस्तूंचा समावेश आहे. यासोबतच चिमणीचे छायाचित्रही लिलावात ठेवण्यात आले आहे. नियॉन लोगोचे चित्रही लिलावात ठेवण्यात आले असून याची किंमत १७ हजार ५०० डॉलर ठेवण्यात आले आहे. यासाठी ६४ लोकांनी बोली लावली आहे. टर ट्विटरच्या पुतळ्यासाठी ५५ लोक लिलावात बोली लावायला पुढे आले आहे. याची किंमत १६ हजार डॉलर ठेवण्यात आली आहे.
शुद्ध वेडेपणा!
एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करणे हा शुद्ध मुर्खपणा ठरल्याचे मत समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे. ३४० अरब डॉलर संपत्तीचा धनी शुक्लकाष्ट मागे लागल्यासारखा ट्विटरकडे का वळला, हा प्रश्न लोकांना सतावत आहे. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी ४४ अरब डॉलर खर्च केले आणि आतापर्यंत त्यांना २०० डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे.
Elon Musk Twitter Very Bad Situation Office