मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात टेस्ला भारतात गुंतवणूक करेल, असे आश्वासन टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी दिले होते. त्यानुसार, आता पुणे येथील विमाननगरला टेस्लाचे मोठे कार्यालय सुरू होणार आहे.
टेस्ला कंपनीने पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर ५५८० चौरस फूट कार्यालयाची जागा घेतली आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे. त्याचे भाडे १ ऑक्टोबर२०२३ पासून सुरू होईल आणि दोन्ही कंपन्यांनी दरवर्षी ५ टक्के वाढीसह ३६ महिन्यांच्या लॉक-इन कालावधीवर सहमती दर्शवली आहे. या कंपनीची इच्छा असल्यास ती आणखी पाच वर्षांसाठी लीज वाढवू शकते. टेस्ला भारतात आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी सज्ज आहे. टेस्ला कंपनी आता पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे आपल्या कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली आहे.
टेस्ला अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील इलेक्ट्रिक कारच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती. त्याचा परिणाम म्हणून आता टेस्लाने पुण्यात कार्यालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्यातू उद्योग पळताहेत, गुंतवणूक येत नाहीये, अशी ओरड होत असताना दुसरीकडे टेस्ला सारखी मोठी कंपनी महाराष्ट्रात कार्यालय सुरू करत असल्याची आशादायी घटना घडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजागाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत.
६० महिन्यांसाठी जागा घेतली भाड्याने
टेस्ला ६० महिन्यांसाठी जागा भाड्याने देण्यासाठी ११.६५ लाख रुपये मासिक भाडे आणि ३४.९५ लाख रुपये डिपॉझिट भरणार आहे. ही जागा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.
Elon Musk Tesla India Maharashtra Office
EV Pune First viman Nagar Rented lease