इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कच्या कुटुंबातून एक घृणास्पद सत्य समोर आले आहे. स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्कचे ७६ वर्षीय वडील एरोल मस्क यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एरोल मस्कने सांगितले आहे की, त्यांचे ३५ वर्षीय सावत्र मुलगी जना बेझुइडेनहाउट सोबत शारीरिक संबंध आहेत. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या मुलीपासून दोन मुलेही आहेत. त्याने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी त्याच्या सावत्र मुलीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. हे सगळे अगदी गुपित आहे. आणि आताच ते समोर आले आहे.
एरोल मस्क आणि त्यांची मुलगी बेझुइडेनहाउटमधील पाच वर्षांचा मुलगा आहे. ज्याचे नाव इलियट रश. याचा जन्म २०१७ मध्ये झाला होता. यानंतर, २०१९ मध्ये बेझुइडनहाऊटने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. म्हणजेच इरोल मस्क यांना टेस्लाचे सीईओ एलोन मस्कसह एकूण सात मुले आहेत.
जना बेझुइडेनहाउट ही एरोल मस्कची दुसरी पत्नी हेड बेझुइडेनहाउटची मुलगी आहे. एरोल मस्कने १९७९ मध्ये इलॉन मस्कची आई माये हॅल्डमन मस्कपासून विभक्त झाल्यानंतर लग्न केले. या लग्नापासून त्याला तीन मुले आहेत – अॅलन, किंबल आणि टोस्का. त्यानंतर एरोलने एका विधवा महिला हेडी बेझुइडेनहाउट हिच्याशी लग्न केले.. हेडीला आधीच दोन मुले होती, ज्यात जना बेझुइडनहाउट होती. तेव्हा तिचे वय चार वर्षांचे होते. एरोल आणि हेडी यांनाही दोन मुले आहेत. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर एरोलने हेडीला घटस्फोटही दिला.
जेव्हा मस्क कुटुंबाला पहिल्यांदा ही बातमी कळली की, जना एरोलच्या मुलाची आई होणार आहे, तेव्हा त्यांना खूप धक्का बसला. यामुळे एरोल आणि अॅलनच्या नात्यातही दुरावा आला. यामुळे आजपर्यंत इलॉन मस्कला त्याचे वडील आवडत नाहीत. वास्तविक, न्यूयॉर्क पोस्टनुसार, एरोल मस्कने ब्रिटिश टॅब्लॉइडला दिलेल्या मुलाखतीत हे कबूल केले. तो म्हणाला की “पृथ्वीवर फक्त एकच गोष्ट आहे ज्यासाठी आपण आहोत. ते म्हणजे पुनरुत्पादन. म्हणजेच जगात नवीन जीवन आणणे.
Elon Musk Father Errol Musk Sexual relation with Daughter