इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात अनेक सेवाभावी संस्था असून त्यांना दानशूर व्यक्तींकडून वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळत असते, तसेच जगभरात दानशूर व्यक्तींची देखील कमतरता नाही, असे म्हटले जाते. अनेक श्रीमंत व्यक्ती अशा अनेक सेवाभावी संस्थांना दान देत असतात. परंतु जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्ती इतके दान कोणीच केले नसल्याचे दिसून येते. टेस्ला ही जगातील सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी असून या कंपनीच्या शेअरची किंमत 5.74 अब्ज डॉलर्स आहे. तसेच या कंपनीचे मालक आणि जगातील सर्वात मोठे श्रीमंत एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे एकूण 5,044, 000 शेअर्स दान केले होते.
टेस्ला कंपनीने ही माहिती यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिली आहे. मात्र ही रक्कम कोणत्या संस्थेला देण्यात आली आहे, हे सांगण्यात आलेले नाही. मस्कने गेल्या वर्षाच्या अखेरीस 16.4 अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले. यासाठी त्यांनी ट्विटरवर एक सर्वेक्षण देखील केले आणि आपल्या फॉलोअर्सना विचारले की, त्यांनी टेस्लामधील 10 टक्के हिस्सा विकावा की नाही. या सर्वेक्षणाचा निकाल काहीही लागला तरी त्यांना शेअर्स विकावे लागतील, असेही सांगण्यात आले. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मस्कने टेस्लाचे शेअर्स गिफ्ट केले तर त्याला त्यातून कर लाभ मिळू शकतो. कारण सेवाभावी संस्थांना दिलेल्या देणग्या भांडवली नफा कराच्या अधीन नाहीत.
मस्कने 2001 मध्ये मस्क फाउंडेशनची स्थापना केली, ज्याची संपत्ती 200 दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 227 अब्ज डॉलर्स आहे. एलोन मस्क यांना कामाची प्रचंड आवड आहे. टेस्ला मॉडेल 3 तयार करताना त्यांनी सांगितले की, ते स्वतःआठवड्यातून 120 तास काम करतात. त्यांना काम करताना कंटाळा येत नाही, उलट त्यात मजा येते, त्यांची ओळख प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक म्हणून होते. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. मस्कची आई मूळची कॅनेडियन असून वडील दक्षिण आफ्रिकेतील आहेत. त्यांना लहानपणापासूनच पुस्तक वाचनाची आवड होती.