गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संप मागे; बघा, देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद (थेट प्रक्षेपण)

by India Darpan
जानेवारी 4, 2023 | 4:31 pm
in मुख्य बातमी
0
Devendra Fadanvis

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संप मिटला आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यशस्वी चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीनंतर फडणवीस यांच्यासह कामगार संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे.
बघा त्याचे हे थेट प्रक्षेपण

LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/ppP2g4eQmM

— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 4, 2023

संपकरी वीज कर्मचाऱ्यांशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्य शासन मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याने संपकरी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेत असल्याचे घोषित केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ऊर्जा विभागातील संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी आमदार भाई जगताप, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ‘महानिर्मिती’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी अन्बलगन तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन सकारात्मकपणे विचार करत असून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. सर्व कायदेशीर आयुधे वापरून पॅरलल लायसन्ससंदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) मध्ये आक्षेप मांडण्यात येईल. कंपनीवर होणारा परिणाम व ग्राहकांचे हित यावेळी प्राधान्याने मांडण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, वीज कंपन्या अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून आर्थिक बळकटीकरणासाठीही ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही काही नावीन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात त्यांचे नक्कीच स्वागत करण्यात येईल. फ्रॅन्चायजी कुठे करायच्या याचा विचार होणे गरजेचे असते. फ्रॅन्चायजीचा उपयोग झाला पाहिजे. त्याद्वारे काही नवीन पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही श्री.फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जास्तीची गुंतवणूक होऊन नव्याने पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत यावर भर देण्यात येत आहे. जलविद्युत प्रकल्पांसंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 

Electricity Workers and Officers Strike Recall Live
Devendra Fadnavis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा जोगेंद्र कवाडे यांची शिंदे गटासोबत युती; निवडणुकीत हव्यात एवढ्या जागा

Next Post

आ. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून सुधारणा; सफाई कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांना मिळणार पदोन्नती

India Darpan

Next Post
IMG 20230104 WA0188 e1672831072105

आ. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून सुधारणा; सफाई कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांना मिळणार पदोन्नती

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011