इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जागो ग्राहक जागो
वीज ग्राहक राजा जागा हो आणि शॉक दे
राज्यात सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे वीजदरवाढीची. त्यामुळे ग्राहक विशेष चिंतेत आहेत. मात्र, ग्राहकांनो तुम्हीच महावितरणला शॉक देऊ शकतात असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का पण हे खरे आहे. ते कसे हेच आपण आज जाणून घेऊ…
ग्राहक राजा वीज कंपनी आणि विज कर्मचारी यांचे कडून त्रासला आहेस का?
१) वीज बिल मुद्दाम चुकीचे दिले जात आहे का?
२)शेतात मोटार कनेक्शन केले नाही तरी बिल दिले आहे का?
३)रिडिंग करण्यासाठी मिटर लॉक नाही तरी मीटर रीडिंग चुकीचे देऊन मुद्दाम त्रास दिला जात आहे का?
४)लाईट मिटर कनेक्शन साठी अर्ज देऊन, कोटेशन भरून पण तुम्हाला वीज मिटर दिले जात नाही का?
५) मुद्दाम प्रचंड वीज बिल दिले आहे आणि कमीत कमी ५०% रक्कम भरा म्हणून सांगत आहेत का?
६) वीज बिल थकले आहे परंतु नोटीस न देता वीज मीटरचे कनेक्शन कापले आहे का?
७)घरगुती वीज मिटर असताना मुद्दाम व्यवसायिक वीज बिल दिले आहे का?
८) उद्योगाची वीज मुद्दाम कापली आहे का?
९) लाईटचा सप्लाय मुद्दाम कमी दाबाचा देत आहेत का?
या सर्व बाबींमुळे ग्राहक म्हणून आपण खचून जाऊ नका. हे खरे आहे की कायदा थोडा उशिरा न्याय देतो परंतु न्याय नक्की मिळतो.
या सर्व गोष्टींसाठी ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो त्याची माहिती घ्या, आपले अधिकार तर अबाधित ठेवाच शिवाय आपण सदर वीज कंपनीचे सेवक आणि कंपनी विरूद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करा बघा कसे आपल्याला त्रास देणे बंद होते आहे ते.
*गरज आहे ती फक्त आपण कृती करायची. केवळ भ्रष्ट मार्गाने आपले काम करणे सोडून द्या. कायद्याचा बडगा दाखवण्याची वेळ आली आहे.*
वीज कर्मचारी *IPC ३५३ नुसार वीज मंडळात बोर्ड लावून ग्राहकांना घाबरवत आहेत. हे बेकायदेशीर आहे.* आपण गुंडागर्दी करायची नाहीये तर आपण ग्राहक कायदा आणि वीज कायद्यातील आपले अधिकार राजासारखे घ्यायचे आहेत. कर्तव्य पार पाडायचे आहे बाकी काही नाही.
आपणास वरील प्रमाणे किंवा इतर प्रकारे वीज मंडळातील लोकांनी त्रास दिला तर आपण खालील प्रमाणे कायदेशीर कारवाई सुरू करा.
१) सदर वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता (executive engineer) ज्याने आपल्याला त्रास दिला आहे. त्यावर एक अर्ज वीज कंपनीतील आपल्या विभागाचे मुख्य अभियंता (chief engineer) यांच्याकडे एक अर्ज रजिस्टर पोस्टाने दाखल करा.
त्यात IPC कलम १६६ नुसार सदर कार्यकारी अभियंता यांच्यावर त्यांनी केलेल्या कृत्यामुळे गुन्हा दाखल करणेची परवानगी किंवा ना-हरकत प्रमाणपत्र मागा. त्यात स्पष्टपणे लिहा की, सदर कर्मचारीने, कार्यकारी अभियंत्याने वीज कायदा कलम ४३ नुसार वीज पुरवठा देणे बंधनकारक असताना, वीज पुरवठा संहिता २०२१ नुसार त्यांनी चुकीचे बिल देऊन, कनेक्शन न देऊन, मुद्दाम बिल वाढवून ग्राहकांना, नागरिकांना त्रास दिला आहे आणि कायद्या प्रमाणे त्याची अम्मल बजावणी न करता त्याचा दुरुपयोग करत आहे. माझ्यासारख्या नागरिकांना विनाकारण त्रास देत आहेत.
सदर प्रकारे कायदा भंग करून मा. राज्यपाल यांचा अवमान केला आहे. कारण राज्यातील सर्व प्रकारचे अध्यादेश हे मा. राज्यपाल यांच्या नावाने प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे मला इंडियन पिनेल कोडनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे तरी आपण त्यासाठी परवानगी द्यावी.
२) वरील पत्राशिवाय आपण www.mahadiscom.in ग्राहक तक्रार निवारण मंच, CGRF यांच्याकडे सोबत दिलेल्या अर्जाप्रमाणे तक्रार दाखल करून त्यांना नुकसान भरपाई देखील मागू शकता. शिवाय जे काम करत नाहीत त्याबाबत आदेश घेऊ शकता.
आपल्या जिल्ह्यातील CGRF चे पत्ते खालील लिंक ने पाहून घ्या आणि तक्रार दाखल करा.
https://www.mahadiscom.in/en/details-of-igrc-addresses-annexure-a-and-cgrf-addresses-annexure-b-2/
३) आपण महावितरण विरूद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे देखील तक्रार दाखल करून नुकसान भरपाई मागू शकता.
ग्राहक आयोगात तक्रार दाखल करणे साठी ई दाखिल द्वारे आपण केस दाखल करू शकता त्याची लिंक खालील प्रमाणे आहे.
https://edaakhil.nic.in/edaakhil/
*ग्राहक राजा तू रहेगा मौन तो तेरी सूनेगा कौन?*
या सर्व गोष्टींसाठी आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आपल्या जिल्ह्यातील लोकांचे मार्गदर्शन घेऊ शकता. *अगदी मोफत*
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक असे
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786
Electricity Supply Service Consumer Complaint by Vijay Sagar