नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाज माध्यमांवर आज वीजदराबाबतचा एक संदेश सर्वत्र मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या संदेशात महावितरणचे वीजदर हे सामान्य नागरिक, मशीद, चर्च आणि मंदिरासाठी वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवरील हा संदेश दिशाभुल करण्यासोबतच सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करणारा असल्याने, अशा फसव्या संदेशाला कुणीही बळी पडू नये असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रकरण क्रमांक २२६/२०२२ च्या आदेशानुसार मंदीर गुरुव्दारा, चर्च या सारख्या प्रार्थना स्थळांना व त्यांची सभागृहे, उद्याने यांची इतर कोणत्याही श्रेणीमध्ये नोंदणी नसल्यास त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे वीजदर आकारणी करावी असे निर्देशित केले आहे. त्यानुसारच सर्व प्रार्थना स्थळांना वीजदर आकारणी केली जात असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर अशा फसव्या संदेशांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यापासून सावध राहाण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Electricity Rates Viral Message MSEDCL Clarification