सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्हाला वीज बील कमी करायचे आहे… तातडीने हे करा… नक्कीच होईल…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 7, 2023 | 5:06 am
in संमिश्र वार्ता
0
Electricity Bill scaled e1660320760516


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्हाला वीज बील खुप येत आहे का… ते कमी करायचे आहे का… तसे असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. महावितरणनेच एक योजना आणली आहे. त्याचा लाभ घेतला तर तुमचे वीज बील चक्क शून्य रुपयेही होऊ शकते. तशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्र यांनी दिली आहे.

चंद्र म्हणाले की, छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने नुकताच एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जानिर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वीज वापरल्यामुळे संबंधित ग्राहकाचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली तर ती नेट मिटरिंगद्वारे महावितरणला विकून नंतरच्या बिलात सवलत मिळविता येते. यामुळे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी कधी शून्य वीजबिलही येते.

राज्यात ६ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १,०४,०३५ झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६५६ मेगावॅट इतकी झाली आहे. ही एकत्रित क्षमता एखाद्या मोठ्या औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्पाएवढी आहे. राज्यात २०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती. त्यानंतर महावितरणच्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

२०१९ – २० या आर्थिक वर्षात अशा ग्राहकांची संख्या २६,०१७ झाली व एकूण क्षमता ५१२ मेगावॅटवर पोहोचली. दोनच वर्षात २०२१ -२२ या आर्थिक वर्षात या ग्राहकांची संख्या ५५,७९८ झाली व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,०१७ मेगावॅट झाली. २०२१ -२२ ते २०२१ -२२ या एका आर्थिक वर्षात रूफ टॉप सोलरद्वारे होणाऱ्या वीजनिर्मिती क्षमतेत ४२१ मेगावॅटची भर पडली. रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. महावितरण ग्राहकांना हे प्रकल्प बसविण्यासाठी मदत करते. महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते. वैयक्तिक वीज ग्राहकांसोबतच हाऊसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते.

The number of electricity consumers who generate rooftop solar power in the state is over one lakh
Electricity Bill Mahavitaran Government Scheme

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष… हे आहे जगातील एकमेव देवकी बालकृष्ण यांचे मंदिर!

Next Post

भारत – एक दर्शन… धर्माची भारतीय संकल्पना…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
bharatmata

भारत - एक दर्शन... धर्माची भारतीय संकल्पना...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011