बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता अत्याधुनिक CO2 बॅटरीमुळे ‘दीर्घ कालावधी’ विद्युत ऊर्जा साठवण होणार…चोवीस तास वीज पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

by India Darpan
जानेवारी 29, 2025 | 11:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ntpc 2X3N0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनटीपीसीने CO2 बॅटरी ऊर्जा साठवण तंत्रज्ञान सुरु केल्याची घोषणा केली आहे जी शाश्वत आणि अभिनव ऊर्जा उपायांच्या दिशेने एक अग्रणी पाऊल आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाचे नेतृत्व नेत्रा या एनटीपीसीची संशोधन आणि विकास शाखेने मेसर्स त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड आणि मेसर्स एनर्जी डोम, इटली यांच्या सहकार्याने केले आहे.

एनटीपीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग म्हणाले, “‘दीर्घ कालावधीसाठी ऊर्जा साठवण’च्या क्षेत्रातील ही एक महत्वपूर्ण घडामोड आहे. कुडगी येथील केंद्रात CO2 बॅटरी सुविधा उभारून तंत्रज्ञानात आघाडी घेतल्याचा एनटीपीसीला अभिमान वाटत आहे. खूप दीर्घ परिचालनात्मक आयुष्य (25 वर्षेहून अधिक), लिथियम आणि कोबाल्ट सारख्या महत्वपूर्ण खनिजांची आवश्यकता नाही, टोपोग्राफी एग्नॉस्टिसिज़्म, कमीतकमी कार्यक्षमता ऱ्हास आणि 100% डिस्चार्ज यासारख्या असंख्य फायद्यांसह हा प्रकल्प विद्युत उर्जेच्या साठवणूक क्षेत्रात नवीन संधी खुल्या करेल.” एनर्जी डोमचे संस्थापक आणि सीईओ क्लॉडिओ स्पाडासिनी पुढे म्हणाले की, CO2 बॅटरी एनटीपीसीच्या कार्बनउत्सर्जन-मुक्त उद्दिष्टांमध्ये आणि चोवीस तास वीज पुरवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि देशांतर्गत सोर्सिंगद्वारे भारताची स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करेल.

एनटीपीसी कुडगी येथे 160 MWh ऊर्जा क्षमतेची एक CO2 बॅटरी स्थापित केली जाईल. हा उपक्रम ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याच्या आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मिती वाढविण्याच्या एनटीपीसीच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. याव्यतिरिक्त, CO2 बॅटरी भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना अनुरूप आहे, ज्यामुळे एनटीपीसीच्या ऊर्जा सुरक्षा आणि आत्मनिर्भरता प्रति वचनबद्धतेला अधिक बळ मिळते. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स जी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर चालते त्या तुलनेत CO2 बॅटरी विशेष इलेक्ट्रो-मेकॅनिकल टर्बोमशिनरीवर आधारित आहे. प्रोसेस फ्लुईड म्हणून निर्जल CO2 वापरून ते ‘क्लोज्ड ब्रेटन थर्मोडायनामिक सायकल’ वर कार्य करते. वाफेकडून द्रव अवस्थेत आणि त्याउलट CO2 चे भौतिक मापदंड हाताळून विजेचे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होते. नवोन्मेषाला चालना देण्यात आणि स्वच्छ ऊर्जा उपायांना प्रोत्साहन नेण्यासाठी एनटीपीसी वचनबद्ध असून भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनातले एक नेतृत्व म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खते आणि औषधांबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकींग करु नये…कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचे निर्देश

Next Post

महाकुंभमध्ये मौनी अमावास्येच्या पर्वकाळात कोट्यवधी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात केले दुसऱे अमृत स्नान

Next Post
image0035E4G

महाकुंभमध्ये मौनी अमावास्येच्या पर्वकाळात कोट्यवधी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात केले दुसऱे अमृत स्नान

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011