सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता आला इलेक्ट्रिक ट्रक… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

जुलै 4, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
Product Image e1688398168447

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रेसा मोटर्सने आपल्या उल्लेखनीय अॅक्सियल फ्लक्स मोटर प्लॅटफॉर्म फ्लक्स३५० वर निर्माण केलेला पहिला इलेक्ट्रिक ट्रक मॉडेल व्ही०.१ (V0.1) चे अनावरण केले आहे. जागतिक बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आलेल्या या ट्रकच्या अनावरणामधून मध्यम व अवजड इलेक्ट्रिक ट्रकसाठी औद्योगिक डिझाइन, अॅक्सियल फ्लक्स पॉवरट्रेन व सुरक्षित बॅटरी पॅक्सप्रती ट्रेसा मोटर्सचा क्रांतिकारी पुढाकार दिसून येतो. हा विकास ट्रेसाची नाविन्यतेप्रती अविरत कटिबद्धता आणि शाश्वत परिवहन सोल्यूशन्सद्वारे संचालित भविष्याप्रती दृष्टिकोनाशी संलग्न आहे.

सध्या, भारतात २.८ दशलक्ष ट्रक्सचा ताफा आहे, ज्यामधून ६० टक्के कार्बन उत्सर्जन होते. यामुळे मध्यम व अवजड ट्रक्ससाठी शून्य उत्सर्जनांची त्वरित गरज दिसून येते. २०२४ मधील आगामी वेईकल स्क्रॅपेज पॉलिसी आणि वाढत्या इंधन खर्चांसह मध्यम व अवजड इलेक्ट्रिक ट्रक्सचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. ट्रेसा मोटर्सचा पारंपारिक डिझेल ट्रक्ससाठी मालकीहक्काचा कमी खर्च असलेले सुरक्षित, नाविन्यपूर्ण व पर्यावरणास अनुकूल पर्याय देण्याच्या माध्यमातून या परिवर्तनाचे नेतृत्व करण्याचा मनसुबा आहे. ट्रेसा मोटर्स एकाच वेळी भारतातील २.८ दशलक्ष ट्रक्सना इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा प्रयत्न करते.

ट्रेसा ट्रक्सचे मुलभूत तत्त्व त्यांचे अॅक्सियल फ्लक्स मोटर तंत्रज्ञान फ्लक्स३५० मध्ये सामावलेले आहे. यामधून जवळपास ३५० केडब्ल्यूची सतत शक्ती मिळते, ज्यामुळे अशा प्रकारचे पॉवर आऊटपुट देणारी ट्रेसा एकमेव भारतीय ओईएम आहे. अॅक्सियल फ्लक्स मोटर्स त्यांचा सुसंगत आकार व हलक्या वजनासाठी प्रख्यात आहेत. जगातील उपयुक्त अॅक्सियल फ्लक्स मोटर्स उत्पादकांसोबत सहयोगाने पूर्णत: भारतात विकसित करण्यात आलेले हे इलेक्ट्रिक ट्रक्स ट्रेसा मोटर्सला जागतिक नवोन्मेष्कारामध्ये अग्रस्थानी ठेवतात.

ट्रेसा मोटर्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन श्रवण म्हणाले ‘‘ट्रेसाच्या मॉडेल व्ही०.१ च्या ऑफिशियल लाँचचा प्रवास आणि आमच्या अॅक्सियल फ्लक्स मोटर प्लॅटफॉर्मचा विकास असाधारण राहिला आहे. आमच्या स्थापनेपासून बरेच काही घडले आहे. आम्ही अनेक आव्हानांवर मात केली. आज मला सांगताना आनंद होत आहे की, मी आपल्या प्रवासाला गती देण्यासाठी ट्रेसाच्या टीममध्ये सामील झालेल्या उद्योगातील काही सर्वात आदरणीय व अनुभवी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत आहे. एकूण ट्रेसामध्ये टीमने आपल्या करिअर्समध्ये (भारत, जर्मनी, यूएस व जपान) २०० हून अधिक प्रकारचे ट्रक्स डिझाइन व निर्माण केले आहेत आणि यापूर्वी २ दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.’’

उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शेकडो घटक उत्तमरित्या डिझाइन करण्यासाठी एएनएसवायएस व एमएटीएलएबी येथे अनेक महिने मोठ्या प्रमाणत सिम्युलेशन्स करण्यात आले. या प्रखर दृष्टिकोनामधून ट्रेसा मोटर्सची प्राधान्य तत्त्वांसह उत्पादने डिझाइन व निर्माण करण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.

ट्रेसा मोटर्सचे मध्यम व अवजड इलेक्ट्रिक ट्रक्स व्यावसायिक वाहन उद्योगामधील प्रमुख झेप आहेत, जे अद्वितीय पॉवर, कार्यक्षमता व पर्यावरणीय फायदे देतात. या मेड इन इंडिया उत्पादनामधून ब्रॅण्डची स्थानिक टॅलेंट व आर्थिक विकासाला चालना देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते. या लाँचसह ट्रेसा मोटर्स भारतातील व भारताबाहेरील इलेक्ट्रिक वेईकल स्थितीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. ट्रेसा मोटर्स आर्थिक वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत मॉडेल व्हीचे प्रत्यक्ष लाँच करणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत घेतले आलिशान घर

Next Post

स्वयंपाकामध्ये वेलची (वेलदोडा) नक्की वापरा… आहेत एवढे सारे फायदे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
cardmom

स्वयंपाकामध्ये वेलची (वेलदोडा) नक्की वापरा... आहेत एवढे सारे फायदे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011