मुंबई – १८ वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या किशोरवयीनांसाठी मोठी खुषखबर आहे. ड्रायव्हिंग लायसन नसल्याने घरचे वाहन चालविण्यास मनाई करतात. मात्र, आता या किशोरवयीनांसाठी येत आहे खास इलेक्ट्रिक स्कूटर.
भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात येत आहेत. देशात इंधनांचे दर दिवसागणिक वाढत असल्याने ग्राहकांचा कल इ वाहनांकडे आहे. ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन कॉरिट इलेक्ट्रिक आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात आणत आहे.
हुव्हर कंपनी या महिन्याच्या अखेरीस बाजारात आपली नवीन हॉवर इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार असून सुरुवातीला ही स्कूटर दिल्लीत लाँच केली जाईल, त्यानंतर ती मुंबई, बेंगळुरू आणि पुणे सारख्या शहरांमध्ये लाँच केली जाईल. सध्या, ही स्कूटर प्री-बुकिंग करण्यात आली आहे. दि. 25 नोव्हेंबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार असून इच्छुक ग्राहक फक्त 1,100 रुपयांमध्ये बुक करू शकतात.
विशेष म्हणजे ही स्कूटर विशेषतः 12 ते 18 वयोगटांसाठी तसेच गोवा किंवा जयपूर सारख्या शहरांमधील पर्यटकांच्या आकर्षणासाठी तयार करण्यात आली आहे. या दोन आसनी इलेक्ट्रिक स्कूटरला डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर्स आणि दोन्ही टोकांना ड्युअल शॉक अॅब्झॉर्बर्स मिळतात. त्यामुळे ती 250 किलोचा भार घेऊ शकते.
इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग ताशी फक्त 25 किलोमीटर असल्याने, त्याला चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सचीही आवश्यकता नसते. ही स्कूटर लाल, पिवळा, निळा, गुलाबी, जांभळा आणि काळ्या रंगात सादर केली जाईल. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या आवडीचा रंग निवडण्याचा पर्यायही मिळेल. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आकर्षक फायनान्स सुविधा पुरवत आहे, तसेच इच्छुक ग्राहक ती भाडेतत्त्वावर घेऊ शकतात.