मुंबई – पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने सध्याच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे. विविध ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या असल्या तरी सर्वांनाच ग्राहक प्रतिसाद देताना दिसत नाहीत. मोजक्याच स्कूटरची चलती आहे. त्यातच सध्या बाजारात एका इलेक्ट्रिक स्कूटरने चांगलीच धूम माजवली आहे. गेल्या ७ महिन्यात या इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल ५० हजाराहून अधिक विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता या इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्रतीक्षेत मोठी वाढ झाली आहे.
हिरो इलेक्ट्रिकला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचा परिणाम म्हणून कंपनीचा बाजार हिस्साही झपाट्याने वाढत आहे. हिरो इलेक्ट्रिकचा सध्या इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये 36 टक्के मार्केट शेअर आहे. या आर्थिक वर्षात, कंपनीने आतापर्यंत 50 हजारांहून अधिक ईव्ही (बाईक/स्कूटर्स) विकल्या आहेत. यासोबतच आता कंपनीची ईव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही त्यांच्या आवडत्या हिरो इलेक्ट्रिक ईव्हीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ऑक्टोबर 2021 अखेरपर्यंत कंपनीची विक्री 50,331 युनिट्सवर होती. वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवत आहे. कंपनीच्या सध्याच्या उत्पादन क्षमतेच्या विस्ताराकडे पाहता, कंपनी आता वर्षाला 5 लाख इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्याच्या स्थितीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हीरो इलेक्ट्रिकला ग्राहकांनी खूप पसंती दिली आहे आणि त्यांचा प्रतीक्षा कालावधीही खूप वाढला आहे. या कंपनीचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले की, सणासुदीच्या ग्राहकांना 50 हजार बाईक दिल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे, परंतु आम्ही त्या 16,500 ग्राहकांची डिलिव्हरीच्या प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधीमुळे माफी मागतो आणि या ग्राहकांना आणखी काही आठवडे लागू शकतात. वाट पहावी लागेल.’
यासोबतच गिल यांनी असेही सांगितले की, कंपनी लवकरात लवकर क्षमता वाढवण्यावर काम करत आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या आवडीची हिरो बाईक शोरूममध्येच मिळू शकेल. इलेक्ट्रिक वाहनांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून, कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक टू व्हीलरची विस्तृत श्रेणी ऑफर करत आहे.
सदर कंपनी उद्योगातील वाढीचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. कार खरेदीदार देखील आता पेट्रोल कार घेण्यास टाळाटाळ करत आहेत आणि यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही तेजी आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल करणेही फारसे महाग नसते.