इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तेलंगणातील हैदराबाद नजीक असलेल्या सिकंदराबाद येथील एका इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याने तब्बल ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत १० जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना गांधी आणि यशोदा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र ही नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सिकंदराबादमधील इलेक्ट्रिक दुचाकींच्या शोरुमला रात्रीच्या सुमारास ही आग लागली. ही आग नंतर वरच्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि इमारतीमध्ये पसरली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्रथामिक अंदाज आहे. शोरुम, बेसमेंट आणि पार्किगमध्ये असणाऱ्या गाड्यांनी पेट घेतला आणि नंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या सात जणांची सुटका केली. १० जण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
https://twitter.com/tweet_aneri/status/1569516644246126594?s=20&t=TUHA0jRPRZ1ghsAgbIogIQ
ही घटना दुर्दैवी असून, जखमींवर चांगले उपचार केले जातील असे सरकारने जाहीर केले आहे. या आगीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी रुमच्या खिडकीबाहेर उभे असल्याचे तसेच पाइपच्या सहाय्याने आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री आणि शहर पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
https://twitter.com/NaseerGiyas/status/1569377251569061888?s=20&t=TUHA0jRPRZ1ghsAgbIogIQ
पोलिसांनी सांगितले की, सिकंदराबादमध्ये स्टेशनपासून जवळच असलेल्या रुबी हॉटेलमध्ये आग भडकली होती. रुबी हॉटेलच्या बेसमेन्टला एका इलेक्ट्रिक गाड्यांचे शोरुम आहे. या शोरुममधील एका इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि आग लागली, असेही सांगितले जात आहे. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले आणि संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. हॉटेलात २० पेक्षा जास्त पर्यटक होते. आगीमुळे धुराचे लोट हॉटेलच्या रुममध्ये शिरले. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. गुदमरल्यामुळे काही जण बेशुद्ध पडले आणि आगीच्या कचाट्यात सापडले.
https://twitter.com/NaseerGiyas/status/1569380209002188800?s=20&t=TUHA0jRPRZ1ghsAgbIogIQ
दुसरीकडे आग लागल्यामुळे संपूर्ण इमारतीत खळबळ उडाली होती. परिणामी काही लोकांनी रुमच्या खिडक्या उघडल्या आणि खिडकीतून थेट खाली उड्या टाकल्या. त्यामुळेही काही जण जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, स्थानिकांनी तातडीने प्रसंगावधान राखत काही जणांना हॉटेलच्या बाहेर काढलं. त्यामुळे काही जणांचा जीव थोडक्यात वाचवला. हैदराबाद पोलीस, अग्निशमन दल यांच्याकडून या संपूर्ण घटनेची आता कसून चौकशी केली जातेय. आग आटोक्यात आली असली तर इमारतीचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
https://twitter.com/CoreenaSuares2/status/1569553835152252932?s=20&t=TUHA0jRPRZ1ghsAgbIogIQ
Electric Bike Show Room Fire 8 People Death
Secunderabad Hyderabad Telangana