मुंबई – राज्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहे. या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर सह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर,औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.