नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तपत्र) – जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारतात निवडणूक हा एक मोठा उत्सव असतो. अतिशय पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडली जाते. याच प्रक्रियेत मतदान करणाऱ्या मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. मात्र, लवकरच आता बोटावरची ही शाई गायब होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे.
निवडणुकीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवून सेल्फी किंवा फोटो घेण्याचा प्रघात आता रुढ झाला आहे. या निळ्या शाईमुळे त्या व्यक्तीने मत दिले की नाही हे कळते. सदर शाई शोधण्याचे श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते. या शाईत सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे ही शाई कमीत कमी ७२तासापर्यंत पुसली जात नाही. परंतु यापुढे या निळ्या शाई आयोजित लेझर मार्कचा वापर करण्यात येणार आहे.
येत्या काही महिन्यातच
निवडणूक आयोग आता बोगस मतदान रोखण्यासाठी आणखी या नवीन तंत्राचा वापर आहे. बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. सदर तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते.
मतदार यंत्रही बदलणार
विशेष म्हणजे या संदर्भातील त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे गैरप्रकार थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, त्याद्वारे मतदाराचा फोटो टिपला जाईल. या यंत्रणेचा वापर झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकतो. मतदानासाठी बाेटांवर लावण्यात येणाऱ्या शाईत चांदी असलेले एक सिल्व्हर नायट्रेट हे रसायन वापरले जाते. चांदीचा वापर केल्यामुळे ही शाई महाग असते
नव्या तंत्रामुळे बोगस मतदानाला आळा बसेल.
अलर्ट जाणार
लेझर स्पॉट केल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली तर ती पकडली जाईल. दुसरीकडे, ईव्हीएममध्ये बसविण्यात आलेला कॅमेरा एआय तंत्रज्ञानाने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओळखून निवडणूक अधिकाऱ्याला अलर्ट पाठवेल. सध्या वापरता असलेली शाई दक्षिण भारतातल्या म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड या कंपनीकडून तयार केली जात आहे. म्हैसूर प्रांताचे त्यावेळचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी १९३७ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती.
खर्च किती
निवडणुकीच्या शाईचा १९६२ पासून वापर केला जात आहे. ही शाई इतर देशातही निर्यात केली जात आहे. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत याचा वापर करण्यात आलेला आहे. २००९च्या निवडणुकीत २० लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती तर २०१४मध्ये ही संख्या २१ लाख झाली २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत शाईच्या २६ लाख बाटल्यांची ऑर्डर निवडणूक आयाेगाने दिली हाेती. त्यासाठी ३३ काेटी रुपये देण्यात आले हाेते. आता नवीन लेझर मार्क तंत्रज्ञानाला किती खर्च येईल हे अद्याप सांगता येत नाही. मात्र हा खर्च शाई वापरापेक्षा कमी असेल असे सांगण्यात येते.
Election Voting Ink Commission New Proposal