इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज विज्ञान भवन येथे दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होत असून त्यात जम्मू आणि काश्मिर व हरियाणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. तर महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत सस्पेन्स कायम आहे. महाराष्ट्र व हरियाणा या राज्याची निवडणूक याअगोदर नेहमी एकत्र झाली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय़ घेतात हे महत्त्वाचे असणार आहे.
काही दिवसांपूर्वी निवडणूक आय़ोगाच्या टीमने या दोन राज्यांचा दौरा केला होता आणि त्यानंतर ३० सप्टेंबरपूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका होतील असे सांगण्यात आले होते.
महाराष्ट्राची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे तर हरियाणाची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ ला संपणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील मुदतीत फारसा फरक नाही. त्यामुळे महाराष्ट्राबाबत केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेते याची उत्सुकता असणार आहे.