नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या नंतर आता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, २०२५
(17 व्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर)
(i) निवडणूक आयोगाच्या निवडणूक घोषणेची अधिसूचना – ७ ऑगस्ट (गुरुवार)
(ii) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट (गुरुवार)
(iii) अर्जांची छाननी करण्याची तारीख २२ ऑगस्ट (शुक्रवार)
(iv) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट (सोमवार)
(v) आवश्यकता भासल्यास मतदान घेण्याची तारीख ९ सप्टेंबर (मंगळवार)
(vi) मतदानाची वेळ – अवधी सकाळी १० ते सायंकाळी ५
(vii) आवश्यकतेनुसार मतमोजणी केली जाईल, ती तारीख ९ सप्टेंबर (मंगळवार)