नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा दणका असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर शिंदे आणि ठाकरे गटाने त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील दोन्ही गटांनी त्यांच्या वकीलांमार्फत हे लेखी प्रतिज्ञापत्र आयोगापुढे सादर केले आहे. त्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे भक्कम दावे केले.
शिंदेंनी त्यांच्या लेखी कागदपत्रांद्वारे दावा केली आहे की, तब्बल ४० शिवसेना नेते, ६ उपनेते, १३ खासदार, ४० आमदार, ४९ जिल्हा प्रमुख, ८७ विभाग प्रमुख आणि एकूण प्रतिनिधी सभेतले २८२ पैकी १९९ जणांचा आपल्याला पाठिंबा आबे. यासंदर्भात त्यांनी जे कागदपत्र सादर केले आहे त्यात हे सर्व नमूद केले.
निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाच्यावतीने ११२ तर शिंदे गटाच्यावतीने १२४ पानांचा लेखी युक्तीवाद करण्यात आला. म्हणजेच, शिंदे गटाची २ पाने अधिक आहेत. या युक्तीवादात ठाकरे गटाने म्हटले आहे की, दहाव्या शेड्युल नुसार या लोकांनी पक्ष सोडला, त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा करु शकत नाहीत. तसा अधिकार त्यांना मिळत नाही. तर, शिंदे गटाने दावा केला आहे की, संघटनात्मक पक्षाचा ठाकरे गटाचा दावाच अयोग्य आहे. कारण, त्यांची निवड ही लोकशाहीला धरुन नाही. त्यामुळे शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख या पदालाच आव्हान दिले होते. आता आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला दिले आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना यावर निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब
शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदेंना मिळणार
निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल
— Prashant Kadam (@_prashantkadam) February 17, 2023
Election Commission on Shivsena name and Party Symbol
Shinde Group Documents Claim Election Commission
Shivsena Politics