मुंबई – पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आयोगाने महापालिका आयुक्तांची आज बैठक घेतली. या सर्व महापालिका निवडणुका वॉर्ड पद्धतीने घेण्याबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आयोगाने आयुक्तांना दिले आहेत. गेल्या सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीने झाल्या आहेत. त्यामुळे एका प्रभागात ४ वॉर्ड असून त्यांचे ४ नगरसेवक आहेत. तर, आगामी निवडणुका वॉर्डनिहाय होण्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी, प्रभाग पद्धती हद्दपार होणार आहे. वॉर्डाचा प्रतिनिधी करणारा नगरसेवक हा त्या त्या वॉर्डमधील प्रश्नांची सोडवणूक करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे.