इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात कोणतीही निवडणूक असो राष्ट्रपती पदापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक निवडणूक नेहमीच चर्चेत असते. सध्या मध्य प्रदेशात पंचायतीच्या निवडणुका देखील असाच चर्चेत आल्या आहेत. कारण मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत.
गुरारिया लष्करपूर पंचायतीच्या सरपंचपदासाठी सुशीलाबाई उमेदवार आहेत. सुशीला आणि त्यांचे पती दोघेही जनसंपर्कात व्यस्त आहेत. त्यांची मते मागण्याची पद्धत एवढी अनोखी आहे की, मीडियात तो चर्चेचा विषय राहिला आहे. विशेष म्हणजे पती-पत्नी आधी मतदारांना राम-राम म्हणत अभिवादन करतात, मग थेट जनतेच्या पायावर लोटागंण घालतात. तसेच साष्टांग नमस्कार करताना हे पती-पत्नी जनतेला मतांसाठी आवाहन करतात, आशीर्वाद मागतात. मतदारही खूष होतात, जिंकून देण्याच्या मतदारांच्या आश्वासनामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
याबाबत बोलताना सरपंच उमेदवार सुशीलाबाई यांचे पती म्हणाले, “आम्ही सर्वांना आशीर्वाद देण्याची विनंती करतो. गावातील शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही काम करू. तसेच गावाचा विकास करणार. आजही मी लोकांना पेन्शन मिळवण्यासाठी मदत करतो. पुढेही मी असेच करत राहीन. माझे जनतेला एवढेच म्हणणे आहे की मला नेता नाही, मुलगा माना. सरपंच नाही तर सेवक बनवा. आमच्या चिन्हावर शिक्का मारून विजयी करा.
जनतेची सेवा करण्याचे आश्वासन देऊन मते मागणाऱ्या सुशीलाबाई बुरखा घालून प्रचार करत आहेत, हे विशेष होय. वेळीही नवरा मुख्य भूमिकेत दिसतो. पतीही सर्वांशी बोलत आहेत. मात्र, प्रचाराची ही पद्धत स्थानिक नागारीकांमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे. मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 25 जून, दुसऱ्या टप्प्यासाठी 1 जुलै आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 8 जुलै रोजी मतदान होणार आहे. मतदान ईव्हीएमने नव्हे तर बॅलेट पेपरवर होईल.
Madhya Pradesh Panchayat election candidate voters falling in feet request attraction campaign new style