पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे व नागपूर विभागातील पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :
जाहीर सूचना प्रसिद्धी – मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनःप्रसिद्धी – बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनःप्रसिद्धी – शनिवार, 25 ऑक्टोबर 2025
प्रकरणपरत्वे नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – गुरुवार, 6 नोव्हेंबर 2025
हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई – गुरुवार, 20 नोव्हेंबर 2025
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी – मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी – मंगळवार, 25 नोव्हेंबर ते बुधवार, 10 डिसेंबर 2025
दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई – गुरुवार, 25 डिसेंबर 2025
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी – मंगळवार, 30 डिसेंबर 2025
या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार संबंधित मतदारांनी वेळेत आवश्यक दावे सादर करून नाव नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.