मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळ्याच्या हंगामामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही निवडणूक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
सहकार विभागाने म्हटले आहे की, राज्यातील गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
याअगोदरही वेगवेगळ्या कारणाने सहकारी संस्थाच्या निवडणूका पुढे ढकलण्या आल्या आहे. आता पावसाचे कारण दिले असले तरी त्यात राजकीय काही कारण असावे असे सहकारी चळवळीत काम करणा-यांनी सांगितले आहे.