मुंबई – नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद झाले आहे. या निवडणुकीत २८५ मतदान झाले होते. पण, कांदे यांचे मत बाद झाल्यानंतर २८४ मतांची मोजणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. कांदे बरोबरच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे यशोमती ठाकुर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावरही आक्षेप घेण्यात आले होते. पण, यात कांदे वगळून सर्वांवर असलेले आक्षेप फेटाळून लावले. त्यामुळे त्यांचे मत वैध झाले. कांदे यांचे मत हे शिवसेना नेते संजय राऊत यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे एक मत कमी झाले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नाही असा आक्षेप त्यांच्यावर होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुध्द न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया आ. कांदे यांच्याकडून देण्यात आली आहे.