इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सुधारित अध्यादेश काढला जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही निर्माण होत असून लोकाभिमुख विकासाची चाके थांबली आहेत. अशी स्थिती असताना सरकार मात्र अद्यापही निवडणुका पुढे ढकलत आहे, हे योग्य नाही अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, निवडणुकीची सत्ताधारी पक्षाला एवढी भीती का वाटतेय? केवळ संविधान आणि लोकशाहीचं नाव न घेता सरकारने तत्काळ निवडणुका घोषित करून लोकशाहीचा आणि संविधानाचा सन्मान करावा!
गेल्या काही वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्यासह अनेक निवडणुका या रखडल्या आहे. या निवडणूका केव्हा होतील यावर कोणीच भाष्य करत नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्य प्रचंड रोष आहे.