नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ विधासभा निवडणुकीच्या कल हळूहळू येऊ लागले आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीने आघाडी घेतली असून महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. पहिल्या फेरीपासून त्याची सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, दिलीप बोरसे हे आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, सुहास कांदे आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार हे आघाडीवर आहेत. तर मालेगाव मध्य मध्ये आसिफ शेख आघाडीवर आहेत.
नाशिक जिल्हयातील १५ विधानसभा मतदार संघात हे उमेदवार आघाडीवर
नाशिक पश्चिम – सीमा हिरे -(भाजप) – 18209 आघाडीवर
नाशिक मध्य – देवयानी फरांदे- (भाजप) -3842 आघाडीवर
नाशिक पूर्व – राहुल ढिकले -(भाजप)- 7830 आघाडीवर
देवळाली – सरोज अहिरे – (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 18477 आघाडीवर
चांदवड – डॅा. राहुल आहेर- (भाजप)- 25956 आघाडीवर
नांदगाव – सुहास कांदे- (शिवसेना शिंदे गट)- 27465 आघाडीवर
मालेगाव – दादा भुसे- (शिवसेना शिंदे गट)- 30190 आघाडीवर
येवला – छगन भुजबळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 7900 मतांनी आघाडी
दिंडोरी – नरहरी झिरवाळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट) – 15457 आघाडीवर ( नववी फेरी )
सिन्नर – माणिकराव कोकाटे- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 13900 आघाडीवर
इगतपुरी – हिरामण खोसकर- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 13500 आघाडीवर
कळवण – जे.पी. गावित – (माकप)- 99 मतांनी आघाडीवर
बागलाण – दिलीप बोरसे – (भाजप)- 10660 आघाडीवर
निफाड – दिलीप बनकर- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 14491 आघाडीवर
मालेगाव मध्य – आसिफ शेख – (अपक्ष) – 3637 मतांनी आघाडीवर
येवल्यात शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे व कळवणमध्ये माकपचे जीवा पांडे गावित हे काही फेरीत आघाडीवर होते. पण, नंतर येथेही बदल होत असून या दोन मतदार संघात मात्र चुरस आहे.