नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत ५० लाख ६१ हजार १८५ मतदरांनी नोंदणी केली असून जिल्ह्याची मतदान टक्केवारीचे ७५+ हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे. बुधवार मतदानासाठी शासनाने सुट्टी घोषित केली आहे. सकाळी ७ ते ९ पर्यंत ६.९३, ९ ते ११ १८.८२ तर ११ ते १ पर्यंत ३२.३५ तर ३ वाजेपर्यंत ४७.११, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.११ टक्के तर अंतिम मतदान ६७.५७ टक्के सरासरी मतदान झाले आहे. जिल्ह्यात कळवण मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.
सरासरी मतदारनिहाय मतदान
नांदगाव – ७०
मालेगाव मध्य- ६९
मालेगाव बाह्य- ६२.८७
बागलाण- ६५.१९
कळवण- ७५.०७
चांदवड – ७६.८१
येवला – ७४.०४
सिन्नर- ७४.९२
निफाड- ७३.१४
दिंडोरी- ७८.०१
नाशिक पूर्व- ५७.६३
नाशिक मध्य- ५६.३४
नाशिक पश्चिम- ५०.३९
देवळाली- ५८
इगतपुरी – ७२.२१
एकुण मतदान – ६७.५७