गौतम संचेती, नाशिक
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी मुख्य लढत बहुतांश मतदार संघात होणार आहे. सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. तर भाजपने पाच जागा जिंकल्या. तर शिवसेनाला २ व काँग्रेस व एमएमआयला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही आमदार शिंदे गटात तर राष्ट्रवादीचे ६ आमदार हे अजित पवार गटात गेले. तर काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामण खोसकर हे नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहे.
या निवडणुकीत महायुतीने विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाला देण्याचे निश्चित केल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा अजित पवार गटाला मिळाल्या आहे. तर त्या खालोखाल भाजपला ५ जागा मिळाल्या आहे. शिंदे गटाला अवघ्या दोन जागा मिळणार आहे. मालेगावच्या जागेवर महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच व शिवसेना ठाकरे गटाला सहा, काँग्रेसला तीन व एक जागा माकपला गेली आहे. शरद पवार गटाला येवला, दिंडोरी, सिन्नर, नाशिक पूर्व, सटाणा, शिवसेना ठाकरे गटाला नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, नांदगाव, निफाड, मालेगाव या जागा मिळाल्या आहे. तर काँग्रेसला चांदवड, मालेगाव व इगतपुरी हे मतदार संघ सोडण्यात आले आहे. कळवण येथे माकपचा उमेदवार आहे.
असे असेल विधानसभा उमेदवार
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी पवार गट)
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) – अनिल कदम ( शिवसेना ठाकरे गट), गुरुनाथ कांदे (प्रहार)
कळवण – नीतीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) – जे. पी. गावित (माकप)
सिन्नर – माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट )- उदय सांगळे (महाविकास आघाडी)
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – सुनीता चारोस्कर (शरद पवार गट)
देवळाली – सरोज आहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) , डॅा. राजश्री अहिरराव (शिवसेना शिंदे गट), योगेश घोलप (ठाकरे गट), अविनाश शिंदे (वंचित)
इगतपुरी – हिरामण खोसकर (अजित पवार गट) – लकी जाधव (काँग्रेस) निर्मला गावित (अपक्ष)
मालेगाव – दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) – अव्दैय हिरे ( शिवसेना ठाकरे गट), बंडुकाका बच्छाव (अपक्ष)
नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) – गणेश धात्रक (शिवसेना ठाकरे गट), समीर भुजबळ, डॅा. रोहन बोरसे (अपक्ष)
नाशिक पूर्व – अॅड राहुल ढिकले ( भाजप) – गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट), प्रसाद सानप (मनसे), जितेंद्र भावे (निर्भय)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप) – वसंत गिते (शिवसेना ठाकरे गट), मुशीर सैय्यद (वंचित)
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप) – सुधाकर बडगुजर (शिवसेना ठाकरे गट) – दिनकर पाटील (मनसे), दशरथ पाटील (स्वराज)
सटाणा – दिलीप बोरसे (भाजप) – दीपीका चव्हाण (शरद पवार गट)
चांदवड – डॅा. राहुल आहेर (भाजप) – शिरीष कोतवाल (काँग्रेस), केदा नाना आहेर (अपक्ष)
मालेगाव – मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (एमआयएम) – एजाज बेग (काँग्रेस), शान ए हिंद (समाजवादी), आसिफ शेख (अपक्ष)