इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू – कश्मिर व हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात प्राथमिक कल समोर आला असून त्यात हरियाणात भाजपने आघाडी घेतली आहे तर जम्मू कश्मिरमध्ये नॅशनल कॅान्फरन्स – काँग्रेस आघाडीवर आहे. दोन्ही विधानसभेत ९०-९० जागा असून बहुमतांचा आकडा ४६ आहे.
हरियाणात सुरुवाताली काँग्रेस आघाडीवर होती. पण, जस जसे निकाल येऊ लागले. तस तसे भाजपचे आकडे वाढू लागले. या राज्यात भाजपने ४८ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसच्या वाट्याला ३६ जागा येतांनाच कल आहे. तर इतर ६ जागा आहे.
जम्म कश्मिरमध्ये नॅशनल कॅान्फरन्स – काँग्रेसने ५० जागांवर आघाडी घेतली असून भाजप २५ जागांवार आघाडीवर आहे. तर पीडीपी ५ व इतर १० जागांवर आघाडीवर आहे.लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा झालेल्या या दोन राज्यात एक विधानसभा भाजपला मिळणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांना यश मिळाले आहे. हरियाणात तिस-यांदा सरकार स्थापन करण्याची संधी भाजपला आहे.
दोन्ही राज्याचे मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोल समोर आले होते. त्यात हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसणार असा अंदाज होता. पण, तो फोल ठरला. विशेष म्हणजे काँग्रेसने मते जास्त घेऊनही जागा मात्र कमी आल्याचे बोलले जात आहे.