मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असल्यामुळे ग्राहकांचा ओढा आता इलेक्ट्रीक वाहनांकडे आहे. अश्यात जवळपास सर्वच कंपन्या इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीसाठी कामाला लागलेला आहे. काही कंपन्यांच्या गा़ड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसतात. आता मारुती सुझुकी कंपनीसुद्धा हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेइकल (एचईव्ही)च्या निर्मितीवर काम करीत आहे. ही गाडी धावता धावता चार्ज होईल, असे सांगितले जात आहे.
मारुती कंपनीच्या या कारला टोयोटा कंपनीसोबत मिळून तयार केले जात आहे. ही कार ड्रायव्हींग करताना रस्त्याच्या काठावर तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमधून मिळणाऱ्या विजेच्या आधारावर चार्ज होत राहील, असेही सांगितले जात आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांमध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या तुलनेत मागे असलेल्या मारुती सुझुकीने हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेइकलसाठी टोयोटासोबत हात मिळविले आहेत. मारुतीच्या काही इलेक्ट्रीक वाहनांचे टेस्टींग संयुक्त स्वरुपात टोयोटासोबत मिळून होणार आहे. पुढील महिन्यात हे परीक्षण होईल. जास्तीत जास्त ग्राहकांकडून प्रतिक्रिया मागवून त्यांनुसार गाडीचे डिझाईन तयार होणार आहे. जेणेकरून ग्राहकांना आवश्यक वाटणाऱ्या सर्व सोयीसुविधा याठिकाणी राहतील, असे कंपनीने म्हटले आहे. भारतात चार्जिंगशी संबंधित सोयीसुविधा वाढत आहेत, तोपर्यंत सेल्फ चार्जिंग मशीनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे मारुती सुझुकी हायब्रिड इलेक्ट्रीक वाहनांचा उपयोग करीत आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
काय आहे सेल्फ चार्जिंग?
सेल्फ चार्जिंग कारमध्ये एक इंटर्नल कम्ब्यूशन इंजीन व्हील रोटेशन व्यतिरिक्त बॅटरीला ऊर्जा प्रदान करण्याचेही काम करते. हा इतिरिक्त उर्जेचा मोठा स्रोत आहे. बॅटरीवर कार चालत असल्यामुळे अश्या गाड्या पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत जास्त अॅव्हरेज देतात.