कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात एक भयानक एक घटना घडली असून या प्रकरणामुळे सर्व उडाली आहे. एका तरुणीचे तरुणावर प्रेम जडले होते. परंतु तिच्या लहान बहिणीला हा प्रकार कळला आणि तिने घरच्यांना हा प्रकार सांगितला. घरच्या मंडळीला त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे रागाच्या भरात या मोठ्या बहिणीने चक्क लहान बहिणीची हत्या केली. विशेष म्हणजे आपला हा गुन्हा उघडकीस येऊ नये, म्हणून तिने आपल्या धाकट्या बहिणीने आत्महत्या केल्याचा बनाव रचना मात्र पोलीस तपासात तिचा हा कट उघड झाला.
प्रेम आंधळे असते असे म्हणतात, त्यामुळे प्रियकर प्रेयसी प्रेमासाठी वाटेल ते करतात, असे दिसून येते. प्रेमात वेडे झालेले तरुण-तरुणी आपल्या प्रेमाला विरोध झाला तर मागचा पुढचा विचार न करता काही करण्यास तयार होत असतात, असे म्हटले जाते. अगदी एखाद्याचाजीव घेण्यासही कमी करत नाही, असे आजच्या काळात काही घटनांमध्ये दिसून येते. अशीच घटना श्रीरामपूर तालुक्यातील कोकमठाण येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोकमठाण येथे मागील महिन्यात ३० तारखेला एका सतरा वर्ष वयाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली, परंतु प्रथम दर्शनी ही आत्महत्या झाल्याचे दिसत असले तरी याबाबत संशय व्यक्त होत होता, त्यानंतर त्या कुटुंबातील मृत तरुणीच्या मोठ्या बहिणीची चौकशी केली असता, खरा प्रकार उघडकीस आला.
मोठी बहिण सृष्टी बनकर (वय १९) या कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीचे श्रीरामपूर येथील आकाश कांगुणे (वय २२) या तरुणांसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. तसेच ते दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. याची कुणकुण सृष्टीच्या धाकट्या बहिणीला लागली. तिने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यावर सृष्टीचे कॉलेजमध्ये जाणे बंद करण्यात येऊन तिला घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे तिला धाकट्या बहिणीचा प्रचंड राग आला आणि घरात कोणी नसताना तिने संतापाच्या भरात आपल्या बहिणीची गळा दाबून हत्या केली. आणि धाकटीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. याप्रकरणी सृष्टीला अटक करण्यात आली आहे.
Elder Sister Murder Younger Sister Kopargaon Crime