मुंबई – एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर शिवसेनेने कारवाई करण्यासाठी कायदेशीर पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीचे आदेश काढले. त्यात बैठकीला उपस्थिती न राहिल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची ट्वीट करुन शिंदे यांनी ही माहिती दिली. सोबतच सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृट्या अवैध असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022