मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – राज्यातील सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळेच दिवसागणिक बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या वाढतच आहे. तर, शिवसेनेकडे असलेल्या आमदारांमध्ये मोठी गळती होत आहे. यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे. शिंदे समर्थकांचा आकडा आता थेट ४६ वर पोहचला आहे.
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंजुळा गावित, योगेश कदम, चंद्रकांत पाटील या आमदारांनी काल रात्री गुवाहाटी गाठली. तर आज पहाटे आणखी सहा आमदारांनी शिंदे यांच्या तंबूत प्रवेश मिळविला आहे. या सर्वांचे फोन नॉटरिचेबल लागत आहेत. तसेच काही खासदारांचा देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. उद्धव यांना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होत आहे. शिंदे यांना काही अपक्षांनीही पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. आणखी काही आमदार सुद्धा लवकरच गुवाहाटी गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आमदार मंगेश कुडाळकर (कुर्ला नेहरुनगर ), सदा सरवणकर (दादर-माहिम ), दादा भुसे (मालेगाव बाह्य ), दीपक केसरकर ( सावंतवाडी ), संजय राठोड (दिग्रस ) आणि दिलीप लांडे (मुंबई ) यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे शिंदे नक्की कितीचा आकडा गाठणार याबाबत उत्सुकता आहे.
शिंदे समर्थक आमदार असे
१. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री – ठाणे
२. विश्वनाथ भोईर – ठाणे
३. बालाजी किणीकर – ठाणे
४. शांताराम मोरे – ठाणे
५. प्रताप सरनाईक – ठाणे
६. गुलाबराव पाटील – कॅबिनेट मंत्री – जळगाव
७. चिमणराव पाटील – जळगाव
८. लता सोनवणे – जळगाव
९. चंद्रकांत पाटील – जळगाव
१०. किशोर पाटील – जळगाव
११. अब्दुल सत्तार – राज्यमंत्री – औरंगाबाद
१२. संजय शिरसाट – औरंगाबाद
१३. प्रदीप जयस्वाल – औरंगाबाद
१४. रमेश बोरणारे – औरंगाबाद
१५. महेंद्र थोरवे – रायगड
१६. महेंद्र दळवी – रायगड
१७. भरत गोगावले – रायगड
१८. ज्ञानराजे चौघुले – उस्मानाबाद
१९. तानाजी सावंत – उस्मानाबाद
२०. बच्चू कडू – राज्यमंत्री – अमरावती
२१. राजकुमार पटेल – अमरावती
२२. शंभूराजे देसाई – गृहराज्यमंत्री – सातारा
२३. महेश शिंदे – सातारा
२४. प्रकाश सुर्वे – मुंबई
२५. सदा सरवणकर – मुंबई
२६. यामिनी जाधव – मुंबई
२७. मंगेश कुडाळकर- मुंबई
२८. प्रकाश अंबिटकर – कोल्हापूर
२९. राजेंद्र पाटील – कोल्हापूर
३०. बालाजी कल्याणकर – नांदेड
३१. संजय राठोड – यवतमाळ
३२. संजय रायमुलकर – बुलडाणा
३३. संजय गायकवाड – बुलडाणा
३४. श्रीनिवास वनगा – पालघर
३५. सुहास कांदे – नाशिक
३६. दादा भुसे – नाशिक
३७. नरेंद्र भोंडेकर – भंडारा
३८. शहाजी पाटील – सोलापूर
३९. अनिल बाबर – सांगली
४०. योगेश कदम – रत्नागिरी
४१. दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
४२. मंजुळा गावित – धुळे
४३. संदीपान भुमरे – राज्यमंत्री – औरंगाबाद
eknath shinde supporters list increasing day by day Maharashtra Political Crisis