मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. तसेच, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, शिवसेना गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे.
शिंदे म्हणाले की, हा वंदनीय हिदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयास विनंती केली आहे की, उपसभापती यांनी १६ आमदारांना बजावलेली नोटिस ही बेकायदेशीर आहे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास किमान १४ दिवसांचा कालावधी देणे आवश्यक होता.
https://twitter.com/mieknathshinde/status/1541385822783807489?s=20&t=w7dBPEH26WnzRtzUi3SWNQ